Breaking News

मराठी पत्रकार परिषदेला 81 वर्षे पूर्ण होऊन 82 व्या वर्षात पदार्पण

मराठी पत्रकार परिषद ,मुंबई
अभिनंदन धन्यवाद आणि आवाहन

शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी युसूफ पठाण

मराठी पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेला 81 वर्षे पूर्ण होऊन 82 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. यानिमित्ताने मराठी पत्रकार परिषदेचा हा वर्धापन दिन दरवर्षी पत्रकारांच्या आरोग्य तपासणीचा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सुमारे पाच हजाराहून अधिक पत्रकारांच्या आरोग्याची तपासणी केली जाते. रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. यावर्षी या 82 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभरातून ग्रामीण तालुका पातळीवर मोठ्या संख्येने पत्रकार बांधवांची आरोग्य तपासणी करून औषधे देण्यात आली. पत्रकारांच्या आरोग्याच्या ईसीजी, ब्लड प्रेशर, शुगर ,स्वॅब टेस्ट, रक्त तपासणी आदी विविध तपासण्या करून औषधे देण्यात आली या शिबीरात राज्यभरातील आरोग्य अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सहकार्याबद्दल त्यांचे धन्यवाद.
मराठी पत्रकार परिषद ही मराठी पत्रकारांची मातृसंस्था असून सुमारे 8000 सदस्यांचा एक परिवारच आहे .1939 साली या परिषदेची स्थापना झाली. त्यावेळी
ऋषीतुल्य पत्रकार, संपादक यांनी या परिषदेची अध्यक्षपद भुषविले. काकासाहेब लिमये ,नर फाटक, पा.वा. गाडगीळ, आचार्य प्र के अत्रे, प्रभाकर पाध्ये ,अनंत भालेराव अशा अनेक नामवंत साहित्यिक विचारवंत पत्रकार यांनी परिषदेचे अध्यक्षपद भूषवले
गेल्या वीस पंचवीस वर्षात परिषदेचे नेतृत्व ज्येष्ठ पत्रकार संपादक एस एम देशमुख आणि किरण नाईक यांनी स्वीकारल्यानंतर मराठी पत्रकारांच्या हितासाठी परिषदेने आक्रमक भूमिका स्वीकारली. शहरी आणि ग्रामीण भागातील पत्रकारांचे प्रश्न घेऊन लढणारी एकमेव संघटना अशी ओळख त्यांनी करून दिली .पत्रकारांच्या ज्वलंत प्रश्नावर प्रसंगी रस्त्यावर उतरून परिषदेने आंदोलने केली. परिणामी पत्रकारांचे हक्क ,संरक्षण कायदा, पत्रकारांना सन्मान पेन्शन योजना, वृत्तपत्रीय दरवाढ आदी विविध प्रश्न मार्गी लागले त्याचे श्रेय परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री एस एम देशमुख ,किरण नाईक आणि त्यांच्या सर्व सहकार्‍यांना आह.े
महाराष्ट्र राज्यात पत्रकार संरक्षण कायदा प्रथम करण्यात आला आणि त्याचे अनुकरण अन्य राज्यांनीही करावे यादृष्टीने मराठी पत्रकार परिषद पाठपुरावा करीत आहे.
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असून त्यांनी पत्रकारिता आणि अन्य क्षेत्रातही राष्ट्रीय कीर्ती मिळवली. या महान विभूतीचा भव्य स्मारकाच्या स्वरूपात सन्मान व्हावा अशी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची तळमळीची इच्छा होती. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्ष असताना गेली आठ-दहा वर्षे केवळ या स्मारकाच्या मागणीसाठी जिल्हा ते मंत्रालय पातळीवर सतत पाठपुरावा केला. गेल्या युति शासनातील अर्थमंत्री मुनगंटीवार आणि अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या सहकार्यातून बाळशास्त्री जांभेकर यांचे पाच कोटीचे भव्य दिव्य स्मारक मंजूर करून घेण्यात जिल्हायंघ आणि मराठी पत्रकार परिषद यशस्वी झाली. या स्मारकाची परिपूर्ती होत असून येत्या दोन महिन्यात ते पूर्णत्वास जाईल. संपूर्ण महाराष्ट्रात बाळशास्त्री जांभेकर यांचे हे भव्य दिव्य स्मारक प्रत्येक मराठी पत्रकाराला प्रेरणा देत राहील.
मराठी पत्रकार परिषद 82 व्या वर्षात पदार्पण करीत आहे . परिषदेची शतकाकडे ही वाटचाल तशी साधी सोपी नव्हती .अनेक संकटे अडचणी येऊन त्यावर मात करून परिषद भक्कम पायावर उभी राहत आहे .असे असले तरीही परिषदेला अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक पत्रकाराने खारीचा वाटा उचलून आपले योगदान देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आज परिषदेच्या 82 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रत्येक पत्रकारांने परिषद बळकट करण्याच्या दृष्टीने आपले योगदान देण्याची शपथ घ्यावी. पत्रकारांची पत्रकारांसाठी पत्रकारांनी चालवलेली ही चळवळ यशस्वी शतकी वाटचाल करो ही शुभेच्छा.
– गजानन नाईक
अध्यक्ष
मराठी पत्रकार परिषद,मुबंई

About Shivshakti Times

Check Also

कोरोना नियमांचे पालन करून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न

कोरोना नियमांचे पालन करून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न शिवशक्ती टाइम्स न्यूज …

राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबणीवर

राज्यात 1 मे पासून लसीकरण सुरु होणार नाही राज्यात लसीकरण सुरु करण्यासाठी पुरेसा लसी उपलब्ध …

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबांना मोफत बियाणे, खते वाटप

मालेगाव तालुका ॲग्रो डिलर्स असोसिएशनच्या वतीने शेतकऱ्यांना करण्यात आलेल्या मदतीचा उपक्रम स्तुत्य : कृषी मंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *