Breaking News

मोदी सरकारविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार ! ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक…..

शिवशक्ती टाइम्स न्यूज

(प्रतिनिधी युसूफ पठाण )

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्याने शेतकऱ्यांनी आता भारत बंदची हाक दिली आहे.
८ डिसेंबरला एक दिवसाचा देशव्यापी संप शेतकऱ्यांनी पुकारला आहे.
केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात आम्ही हा संप पुकारला असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.
सरकारतर्फे जी बैठक आयोजित केली आहे त्या बैठकीला आम्ही हजर राहू असंही शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांच्या संपाचा नववा दिवस आहे.
मोदी सरकारने कृषी कायदे रद्द करावेत त्यात सुधारणा करु नये अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
पंजाब, हरयाणा या राज्यातले शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत.
त्यांना अडवण्यात आलं असलं तरीही ते आंदोलनावर ठाम आहेत.
केंद्र सरकारने चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे.
मात्र आत्तापर्यंतच्या चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत.
त्यानंतर आता शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे.
कृषी कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन सुरुच राहणार आहे.
मोदी सरकारने हे कायदे रद्द करावेत हीच आमची ठाम भूमिका आहे असं ऑल इंडिया किसान सभेचे कार्यकारी सचिव हनान मोलाह यांनी म्हटलं आहे.
आम्ही सरकारला आमची मुख्य मागणी सांगितली आहे.
तिन्ही कृषी कायदे मागे घेण्यात यावेत, रद्द करण्यात यावेत ही आमची मुख्य मागणी आहे.

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.