Breaking News

घरफोड्या करणारी ‘सी.एम.’ टोळी गजाआड ;१९ लाखांचा मुद्देमाल जप्त…….

शिवशक्ती टाइम्स न्यूज (प्रतिनिधी युसूफ पठाण )

पिंपरी-चिंचवड शहरात घरफोड्या करणाऱ्या ‘सी.एम.’ टोळीला गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अटक केली आहे.
त्यांच्याकडून १९ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून यात ३८ तोळे सोन्याचे दागिने आणि १ किलो चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे.
ज्या सोसायटीमध्ये सुरक्षारक्षक आणि सी.सी.टी.व्ही. नसेल, त्या सोसायट्यांना लक्ष्य करून ‘सी.एम.’ टोळी घरफोड्या करत असत असे, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.
या प्रकरणी पिंपरी-चिंचवड शहरातील आठ आणि पुण्यातील एका पोलीस ठाण्यातील गुन्ह्याची उकल झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
सी.एम. टोळीचा म्होरक्या चंद्रकांत माने उर्फ अनंत माने याच्या नावाच्या शॉर्ट फॉर्ममुळे ही टोळी ‘सी.एम.’ (C.M.) टोळी म्हणून कुविख्यात होती.
या टोळीतील चंद्रकांत उर्फ अनंत माने (२७), राजू शंभू देवनाथ उर्फ राजू बंगाली (२०), राम उर्फ रामजाने लक्ष्मण क्षीरसागर (२६) आणि अमोल उर्फ भेळ्या अरुण माळी उर्फ घुगे (२७) यांना गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सी.एम. टोळी ही पिंपरी-चिंचवड शहरातील परिसरात गेल्या दोन ते तीन महिन्यापासून घरफोड्या करत होती.
सोसायटीच्या परिसरात ऑटो रिक्षाने फेरफटका मारून सुरक्षारक्षक आणि सी.सी.टी.व्ही. नसल्याची खात्री करूनच संबंधित टोळी घरफोड्या करायची.
दरम्यान, पोलिसांना या टोळीचा मुख्य सूत्रधार चंद्रकांत माने आणि इतर तीन साथीदार हे उस्मानाबाद येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती.
त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळ यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद येथून आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
सखोल चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून १९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

About Shivshakti Times

Check Also

मटण बनवण्यास उशीर होईल सांगितल्याने पती संतापला, मारहाणीत पत्नीचे दातच पाडले……..

मटण बनवण्यास उशीर होईल सांगितल्याने पती संतापला, ⭕मारहाणीत पत्नीचे दातच पाडले…….. शिवशक्ती टाइम्स न्यूज – …

सांगली खून प्रकरण गुन्हे शाखा युनिट चार पिंपरी-चिंचवड कडून मुख्य आरोपीस 24 तासाच्या आत अटक व गुन्हा उघड

पिंपरी-चिंचवड-  प्रतिनिधी – युसूफ पठाण  याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 13 सप्टेंबर 2020 रोजी …

 पुणेकरांना दिलासा…! पुणे जिल्ह्यातील मार्गावर सुरू होणार….! एसटीची सेवा – शिवशक्ती टाइम्स न्यूज

🛑 पुणेकरांना दिलासा…! पुणे जिल्ह्यातील मार्गावर सुरू होणार….! एसटीची सेवा 🛑 ✍️ पुणे 🙁  ब्युरो चीफ शिवशक्ती टाइम्स न्यूज …

Leave a Reply

Your email address will not be published.