मणिपूरमधील थोंबूल जिल्ह्य़ातील पोलीस ठाण्याला प्रथम क्रमांक……
शिवशक्ती टाइम्स न्यूज (उपसंपादक – आनंद दाभाडे )
मुंबई : केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने निवड करण्यात आलेल्या देशातील दहा उत्कृष्ट पोलीस ठाण्यांच्या यादीत महाराष्ट्रातील एकाही पोलीस ठाण्याचा समावेश झालेला नाही.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने दरवर्षी देशातील दहा पोलीस ठाण्यांना उत्कृष्ट पोलीस ठाण्याचा पुरस्कार दिला जातो.
२०२० मधील दहा पोलीस ठाण्यांची यादी गृहमंत्रालयाने जाहीर केली.
मणिपूरमधील थोंबूल जिल्ह्य़ातील पोलीस ठाण्याला पहिला पुरस्कार मिळाला.
दुसरा क्रमांक तमिळनाडूतील सालेम शहर तर तिसऱ्या क्रमांकावर अरुणाचल प्रदेशमधील चँगलँग जिल्ह्य़ातील पोलीस ठाण्याला मिळाला.
महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या दादरा नगर- हवेली खानवेल पोलीस ठाण्याचा दहा जणांच्या यादीत समावेश आहे.
गोवा, छत्तीसगड, अंदमान आणि निकोबार, सिक्कीम, उत्तर प्रदेश, तेलंगणा या राज्यांमधील पोलीस ठाण्यांचा दहा जणांच्या यादीत समावेश आहे.
या यादीत महाराष्ट्रातील एकाही पोलीस ठाण्याचा समावेश झालेला नाही.
देशातील १६,६७१ पोलीस ठाण्यांमधून दहा पोलीस ठाण्यांना पुरस्कार दिला जातो.
यासाठी गृहमंत्रालयाने निकष निश्चित केले आहेत.
प्रत्येक राज्यातून तीन पोलीस ठाण्यांचा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
या यादीतून दहा उत्कृष्ट पोलीस ठाण्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
गुन्ह्य़ांचा छडा लावण्याचे प्रमाण, महिला व दुर्बल घटकांच्या विरोधातील गुन्ह्य़ांच्या तपासाचे प्रमाण आदी १९ निकष निश्चित करण्यात आले होते.
देशातील दहा उत्कृष्ट पोलीस ठाणे
- नोंगपोक सेमकई, थौबल, मणिपुर
- एडब्ल्यूपीएस सुरमंगलम, सालेम सिटी, तमिलनाडु
- खरसांग, चांगलांग, अरूणाचल प्रदेश
- झिलमिल (भैया थाना), सुरजापुर, छत्तीसगढ़
- संगुएम, दक्षिण गोवा, गोवा
- कालिघाट, उत्तर और मध्य अंडमान, अंडमान और निकोबार द्वीप समूह
- पॉकयोग, पूर्वी जिला, सिक्किम
- कांठ, मुरादाबाद, उत्तर प्रदेश
- खानलेवा, दादरा और नागर हवेली, दादरा और नागर हवेली
- जम्मीकुंटा टाउन पीएस, करीमनगर, तेलंगाना
NongpokSekmai Police Station in Thoubal, Manipur tops the list of Top 10 Police Stations in the country, says Ministry of Home Affairs
AWPS-Suramangalam PS, Salem City (Tamil Nadu)& Kharsang PS in Changlang (Arunachal Pradesh) are on the second & the third spot on the list pic.twitter.com/3v6UHLSI5U
— ANI (@ANI) December 3, 2020