पोलिस पाटीलांचे मानधन वाढीसह अनेक प्रश्न मार्गी लागणार
शिवशक्ती टाइम्स न्यूज
महाराष्ट्र राज्यातील पोलीस पाटील यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पोलिस पाटील संघटनेचे राज्य अध्यक्ष महादेव पाटील नागरगोजे यांनी नागपूर येथे दि.१७/११/२०२० ला दिलेल्या निवेदनानुसार पोलिस पाटील यांच्या मागण्या संदर्भात चर्चा करण्यासाठी दि.०३/१२/२०२० ला राज्यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तर नरहरी झिरवाळ विधानसभा उपाध्यक्ष, सतेज पाटील गृहराज्यमंत्री, सौ. सुरेखाताई ठाकरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरावती यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यांच्या विधानभवनात बैठक घेण्यात आली.
पोलिस पाटील यांचे राज्याचे नेतृत्व महादेव नागरगोजे पाटील सदर बैठकीत पोलिस पाटील यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली.
महागाईच्या काळात तुटपुंज्या मानधनावर काम करत असलेल्या पोलिस पाटील यांना पंधरा हजार मानधन देण्यात यावे,
वयोमर्यादा ६५ वर्ष करणे
नुतनीकरण प्रकिया पुर्ण बंद करणे
पेंशन योजना सुरू करणे
पोलिस पाटील अधिनियम कायदा दुरुस्ती करणे
रेती उत्खनन होत असल्याने पोलिस पाटील यांना खोट्या गुन्ह्यात अडकून विनाकारण कायदेशीर कारवाई सामोरे जावे लागत असल्याने उपविभागीय अधिकारी यांनी घटनेची पुर्ण चौकशी करून कारवाई करणे
राज्यात कोरोणा संसर्ग होऊन मृत्युमुखी पडलेल्या पोलिस पाटील यांच्या कुटुंबीयांना विमा देण्याबाबत व टाळेबंदी काळात राज्यातील पोलीस पाटील यांनी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तिन महिन्यांचे अतिरिक्त मानधन देण्यात यावे,
जिल्हास्तरावर आणि तालुका स्तरावर पोलिस पाटील भवन उभारण्यात यावे
ज्या ठिकाणी पोलिस स्टेशन आणि पोलिस चौकी आहे तेथील पोलीस पाटील यांना वयोमर्यादा संपेपर्यंत कायम ठेवण्यात यावे,
मेळघाट तथा आदिवासी बहुल भागातील पोलिस पाटील यांना विशेष अधिकार प्रदान करुन पोलिस पाटील यांची पदभरती करण्यात यावी,
जिल्हा आणि राज्यपाल पुरस्कार पुन्हा सुरू करण्यात यावेत
अशा अनेक प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली, येत्या काही दिवसांत मंत्री मंडळ बैठक घेऊन व या बैठकीसाठी संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी यांना बोलावून प्रलंबित मागण्यांबाबत निर्णय घेण्याच आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले, राज्यातील पोलीस पाटील यांच्या प्रलंबित प्रश्नांना शासन दरबारी वाचा फोडण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल सुरेखाताई ठाकरे यांचे पोलिस पाटील संघटना पदाधिकारी आणि गृहमंत्री यांनी कौतुक केले.
या बैठकीत पोलिस पाटील संघटना राज्य पदाधिकारी उपाध्यक्ष कैलास बच्छाव पाटील (मालेगाव), राज्य समन्वयक माऊली मुंडे, जिल्हाध्यक्ष सोलापूर दिलीप पाटील, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विठ्ठल पाटील, जिल्हाध्यक्ष अमरावती राहुल उके पाटील, यवतमाळ जिल्हाध्यक्ष रुपेश सावरकर पाटील, राज्य मुख्य प्रसिद्धी प्रमुख उमेश तरे पाटील, जिल्हाध्यक्ष परभणी भेडेकर पाटील, राज्य प्रसिद्धी प्रमुख निरंजन गायकवाड पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य नारायण ढवळे पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा.टि.बी.रामटेके पाटील, नाशिक जिल्हाध्यक्ष किरण जाधव,जिल्हाध्यक्ष वर्धा मनोज हिवरकर, जिल्हाध्यक्ष ठाणे संतोष चौधरी अमरावती जिल्हा महासचिव पंजाबराव गजबे पाटील अमरावती जिल्हा उपाध्यक्ष बब्बु अजनेरीया, संजय चव्हाण पाटील, सहप्रसिध्दी प्रमुख अमरावती जिल्हा सह अनेक संघटना पदाधिकारी, गृहसचिव, अप्पर मुख्य सचिव गृह विभागाचे मंत्रालयीन वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोरोना काळात जीवाची बाजी
राज्यभरातील 36 हजार पोलिस पाटीलांनी कोरोना काळात आपल्या जीवाची बाजी लावत नागरीक तसेच सरकारच्या मधातील दुवा बनत कार्य केले. यामध्ये 19 पोलिस पाटीलांचा मृत्यू झाला. विमा न काढल्याने त्यांच्या परीवाराला मदत मिळालेली नाही. घोषीत केल्याप्रमाने त्यांना पन्नास लाखाची मदत मिळणे गरजेचे आहे. आमच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक विचार करेल अशी आम्हाला खात्री आहे.
यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे राज्य उपाध्यक्ष कैलास बच्छाव पाटील (मालेगाव), नाशिक जिल्हाध्यक्ष किरण जाधव, राज्य प्रसिद्धी प्रमुख निरंजन गायकवाड, कळवण कार्याध्यक्ष बेनके पाटील, मालेगाव तालुका अध्यक्ष निलेश पाटील , तालुका प्रसिद्धी प्रमुख महेश शिंदे, खजिनदार एकनाथ अहिरे, तालुका समन्वयक प्रदीप अहिरे , चांदवड तालुका अध्यक्ष रमेश ठाकरे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे आभार मानले.