Breaking News

लागबागमध्ये सिलेंडरचा स्फोट, 16 जण होरपळले

शिवशक्ती टाइम्स न्यूज (प्रतिनिधी युसूफ पठाण)

मुंबई : मुंबईतील लालबाग परिसरात एका इमारतीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात 16 जण जखमी झाले असून जखमींना तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लालबाग इथे गणेश गल्ली परिसरातील साराभाई इमारतीत आज सकाळी 7.50 च्या सुमारास ही घटना घडली. या इमारतीच्या एका बंद खोलीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून गॅस गळती होत होती. याबद्दल स्थानिकांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली. त्यानंतर गॅस गळतीचा वास कुठून येतो हे पाहण्यासाठी स्थानिक आणि अग्निशमन दलाचे अधिकारी इमारतीत गेले असता अचानक स्फोट झाला.
आगीचा अचानक भडका उडाल्यामुळे 16 जण जखमी झाले आहे. यात 3 महिला आणि 10 पुरुषांचा समावेश आहे. जखमींपैकी काही जणांवर केईम अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. तर चार जणांवर ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी अग्निशमन दलाचे अधिकारी हजर आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले आहे. पण नेमकी गॅस गळती का झाली, हे अद्याप मात्र कळू शकले नाही.

मुंबई:- आज दि. ०६/१२/२०२० रोजी सकाळी ०७:१२ वाजताच्या सुमारास साराभाई बिल्डिंग, गणेश गल्ली, लालबाग, मुंबई येथे दुसऱ्या मजल्यावरील १७ नंबर खोलीमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली होती. मुंबई अ.दलाकडून ०७:५० वाजताच्या सुमारास आग पुर्णपणे विझवण्यात आली आहे. सदर घटनास्थळी मुंबई अ. केंद्राचे २ फायर वाहन आणि २ जम्बो वॉटर टँकर उपस्थित होते. सदर घटनेत एकूण २० व्यक्तींना दुखापत झालेली असून १६ व्यक्तींना के इ एम हॉस्पिटल आणि उर्वरित ४ व्यक्तींना मसिना हॉस्पिटल, मुंबई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असे मुंबई नियंत्रण कक्षातून मिळालेल्या माहिती नुसार अद्यावत.

के. ई. एम. हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे:-

#प्रकृतीगंभीरअसलेल्या_व्यक्ती
१) श्री. प्रथमेश मुंगा (पु./ २७)
२) श्री. रोशन अंधारी (पु./ २७ वर्षे)
३) श्री. मंगेश राणे (पु./ ६१ वर्षे)
४) श्री. महेश भुंग (पु./ ५६ वर्षे)
५) श्री. ज्ञानदेव सावंत (पु./ ८५ वर्षे)
६) श्रीमती सुशिला बांगर (स्री/ ६२ वर्षे)

#प्रकृतीस्थिरअसलेल्य_व्यक्ती

१) श्रीमती ममता मुंगा (स्री/ ४८ वर्षे)
२) श्री. विनय शिंदे (पु./ ७५ वर्षे)
३) श्री. करीम (पु./ ४५ वर्षे)
४) कुमार ओम शिंदे (पु./ २० वर्षे)
५) कुमार यश राणे (पु./ ०९ वर्षे)
६) कुमार मिहीर चव्हाण (पु./ २० वर्षे)

#मसिनाहॉस्पिटलमध्येदाखलझालेल्याव्यक्तिंचीनावेपुढीलप्रमाणे:-
१) श्री. सुर्यकांत साठ (पु./ ६० वर्षे)
२) श्री. प्रथमेश भुंग (पु./ २७ वर्षे)
३) श्रीमती वैशाली हिमांशु (स्री/ ४४ वर्षे)
४) कुमारी त्रीशा (स्री/ १३ वर्षे)

#हॉस्पिटलमध्येदाखलहोण्यासनकारदिलेल्याव्यक्तींचीनावे:-

१) श्री. हिमांशू कहियार (पु./ ४४ वर्षे)
२) श्रीमती बिना अंबिका (स्री/ ४५ वर्षे)
सदरची माहिती मुंबई आपत्ती व्यवस्थापन कक्षातून मिळालेल्या माहिती नुसार अद्यावत.

About Shivshakti Times

Check Also

बनावट कागदपत्रांद्वारे मलजल विल्हेवाटीचे काम कंत्राटदाराच्या पदरात……

शिवशक्ती टाइम्स न्यूज (प्रतिनिधी युसूफ पठाण) बनावट कागदपत्रांद्वारे मलजल विल्हेवाटीचे काम कंत्राटदाराच्या पदरात…… मुंबई : …

महिलेचं आठ महिन्यांपासून आईच्या मृतदेहासोबत वास्तव्य, धक्कादायक प्रकाराने पोलीसही चक्रावले…..

प्रतिनिधी – युसूफ पठाण शिवशक्ती टाइम्स न्यूज मुंबई पोलिसांना वांद्रे येथील घरात ८३ वर्षीय महिलेचा …

कोकेन तस्करांचे भारतीय साथीदार गजाआड, डी.आर.आय.ची मुंबई, नवी मुंबई, उदयपूर येथे तीन दिवस कारवाई….

प्रतिनिधी – युसूफ पठाण शिवशक्ती टाइम्स न्यूज   मुंबई : महसूल गुप्तचर संचलनालयाने (डी.आर.आय.) तीन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *