Breaking News

अल्पवयीन मुलाच्या लैंगिक शोषणप्रकरणी महिला अटकेत……

अल्पवयीन मुलाच्या लैंगिक शोषणप्रकरणी महिला अटकेत……

मुंबई : अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी २४ वर्षीय महिलेला अटक केली.
पीडित मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
आरोपी महिला ओशिवरा परिसरात एका शॉपिंग सेंटरमध्ये कामाला असून तिला तीन वर्षांंचे मुल आहे.
तर पीडित मुलगा १६ वर्षांंचा आहे.
ती सप्टेंबरपासून या  मुलाच्या घरी भाडय़ाने राहत होती.
नोव्हेंबरच्या सुरवातीला तिने त्यांची खोली सोडली.
यादरम्यान सुमारे चार ते पाच वेळा या महिलेने मुलाचे लैंगिक शोषण केले.
याबाबत मुलाच्या आईला त्याच्या मित्रांकडून माहिती मिळाली.
त्यानंतर आईने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
मात्र तक्रार दाखल केल्याचे समजताच ही महिला मालाड येथील राहत्या घरातून फरार झाली.
याबाबत तांत्रिक तपासाच्या साहाय्याने गोरेगाव पोलिसांनी तिचा थांगपत्ता शोधून काढला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
याप्रकरणी आरोपींविरोधात  पॉस्कोअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

About Shivshakti Times

Check Also

वाईफ स्वॅपिंगसाठी नवरा करत होता जबरदस्ती, अखेर महिलेने उचलले हे पाऊल…..

शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी युसूफ पठाण अहमदाबादच्या एस.जी. हायवेवरील वाय.एम.सी.ए. क्लब जवळच्या पॉश वसाहतीत …

बनावट कागदपत्रांद्वारे मलजल विल्हेवाटीचे काम कंत्राटदाराच्या पदरात……

शिवशक्ती टाइम्स न्यूज (प्रतिनिधी युसूफ पठाण) बनावट कागदपत्रांद्वारे मलजल विल्हेवाटीचे काम कंत्राटदाराच्या पदरात…… मुंबई : …

लागबागमध्ये सिलेंडरचा स्फोट, 16 जण होरपळले

शिवशक्ती टाइम्स न्यूज (प्रतिनिधी युसूफ पठाण) मुंबई : मुंबईतील लालबाग परिसरात एका इमारतीत गॅस सिलेंडरचा …

Leave a Reply

Your email address will not be published.