Breaking News

आपल्या शरीरात एकूण किती पेशी आहेत?

आपल्या शरीरात एकूण किती पेशी आहेत?

शिवशक्ती टाइम्स न्यूज

आपल्या सर्वांची सुरुवात होते तेव्हा शरीरात केवळ एकच पेशी असते.
आईच्या बीजपेशीचं वडिलांच्या शुक्रपेशीकरवी फलन होऊन तयार झालेली पिंडपेशी; पण त्यानंतर त्यात झपाट्यानं वाढ होत आपली पूर्ण वाढ होते तोवर शरीरात कितीतरी पेशी तयार झालेल्या असतात.
त्यांची नेमकी संख्या किती आहे, याची मोजदाद करण्यासाठी कोणी आजवर बसलेलं नाही.
तशी करायचा उत्साह कोणी दाखवला तरी ते जमणं कठीणच आहे.
त्यामुळे शरीराचं एकंदरीत वस्तुमान, एकंदरीत आकारमान, निरनिराळ्या अवयवांचे तुलनात्मक आकार, त्यांच्या पेशींचं आकारमान वगैरेवरून साधारण अंदाज बांधणंच आपल्या हाती आहे.
त्या गणितानुसार आपल्या शरीरात एकूण एक लाख अब्ज पेशी असाव्यात, असा अंदाज आहे.
आकड्यांमध्ये ही संख्या लिहायची झाल्यास
एकावर १४ शून्यं द्यावी लागतील.
यातल्या सगळ्याच पेशी मानवी आहेत., असं म्हणता येणार नाही.
कारण जवळजवळ ४० हजार अब्ज म्हणजेच एकूण संख्येच्या ४० टक्के पेशी या शरीरात वावरणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या आहेत.
आपल्या पचनाला मदत करणारे कितीतरी जीवाणू आपल्या आतड्यांमध्ये कायमची वस्ती करून असतात.
इतरत्रही. त्यामुळे मानवी पेशींची संख्या पन्नास ते साठ हजार अब्ज एवढी होते.
यातल्या फक्त दहा टक्के म्हणजे साधारण पाच ते सहा हजार अब्ज पेशी शरीरातल्या स्नायू, प्लीहा, मूत्रपिंड, हाडे, यकृत, मेंदू, जठर, त्वचा यांसारख्या ठोस अवयवांची बांधणी करतात.
सर्वात जास्त संख्या असते ती रक्तप्रवाहातून शरीरभर फिरणाऱ्या तांबड्या पेशींची. एकूण ३० हजार अब्ज रक्तपेशी कोणत्याही क्षणी आपल्या शरीरात संचार करत असतात.
जखमा भरून काढण्यासाठी मदत करणाऱ्या पेशिकांची, प्लेटलेट्सची संख्या असते २ हजार अब्ज.
लिम्फपेशींचे अनेक प्रकार आहेत.
तरी त्यांची एकूण संख्या अर्धा अब्ज किंवा पन्नास कोटी असते.
यापैकी काही लिम्फपेशी रक्तप्रवाहातून संचार करत असतात तर काही लिम्फप्रवाहामधून, आपल्या शरीराचं रोगजंतुंपासून संरक्षण करण्याचं काम या पेशी करतात.
अशा या रक्ताशी निगडित असणाऱ्या पेशींची संख्या जास्त असली तरी त्यांचं आकारमान आणि वस्तुमान कमी असल्यामुळे ठोस अवयवांच्या बांधणीत गुतलेल्या पाच ते सहा हजार अब्ज पेशीच शरीराच्या एकूण वस्तुमानाला जबाबदार असतात.

⭕साभार
डाॅ. बाळ फोंडके यांच्या ‘किती ?’ या पुस्तकातुन

About Shivshakti Times

Check Also

मालेगावी १० तलवारींसह चौघे ताब्यात

शहर पोलिस उपअधीक्षक यांच्या विशेष पथकाची कारवाई शिवशक्ती टाइम्स न्यूज मालेगाव : प्रतिनिधी शहरातील रमजानपुरा …

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️ चलन अथवा दंडाची रक्कम जागीच भरण्याबाबत जबरदस्ती करू नये,” …

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी -युसूफ पठाण मुख्यमंत्री उद्धव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *