Breaking News

महाविकास आघाडी चा महत्त्वाचा निर्णय, महात्मा फुले जीवनदायी योजनेत सर्व रेशन कार्ड धारक समाविष्ट

शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी युसूफ पठाण

कोल्हापूरसह जिल्ह्यातील ४४ दवाखान्यांचा समावेश…
🌹□ महाराष्ट्रातील सर्वच आर्थिक स्तरातील नागरिकांसाठी नव्याने विस्तारीत महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना लागू…
🌹○सर्वच म्हणजे केशरी रेशनकार्ड धारकासह अगदी पांढऱ्या रेशन कार्डधारकांनासुद्धा पाच लाखापर्यंतचे उपचार यामध्ये मोफत मिळणार…
🌹□या योजनेच्या माध्यमातून अगदी छोट्या-छोट्या आजार विकारापासून ते मोठमोठ्या आजार विकारांपर्यंत अगदी सरकारी दवाखान्या मधून मिळणारे उपचार सुद्धा खाजगी दवाखान्या मधून मोफत मिळणार…
🌹○युनायटेड इन्शुरन्स कंपनीच्या सहयोगातून राज्यांमध्ये सुरू झालेली ही योजना पंधराशे कोटी रुपयांची आहे…
🌹□महात्मा फुले जीवनदायी योजनेचा पुन्हा विस्तार केलेला आहे. सर्वच आजार समाविष्ट असलेल्या या नव्या आणि विस्तारित योजनेचा फायदा राज्यातील सर्वच नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे…
🌹○योजनेअंतर्गत विविध आजारांवरील सरकार आणि इन्शुरन्स कंपनीने ठरवलेले दर आहेत त्यानुसारच आकारणी…
🌹□या योजनेत कोल्हापूर जिल्ह्यातील जे दवाखाने समाविष्ट आहेत, त्यांची यादी सोबत देत आहोत. दरम्यान ; कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही मोठे दवाखाने याआधी या योजनेत समाविष्ट होते. परंतु सरकारच्या तपासणीमध्ये काही त्रुटी आढळून आल्यानंतर त्यांची सेवा बंद केलेली आहे. या आणि इतर सर्व हॉस्पिटल्सनी या योजनेत नव्याने समाविष्ट व्हावे. तसेच सरकारने जे आजारनिहाय उपचाराचे दर घालून दिलेले आहेत. त्याप्रमाणे आकारणी करावी…
🌹○मुंबई मध्ये या सेवा-कॅन्सर, मेंदू, मणका, किडनी , लिव्हर किंवा असे जे महाभयानक रोग आहेत, त्या रुग्णांना फार मोठा आधार या उपचारांचा…
या विस्तारित महात्मा फुले जीवनदायी योजनेचा लाभ घेऊ घ्या.
🌹○ज्या रुग्णांना ताप,सर्दी,खोकला किंवा कोरोनाची लक्षणे आहेत ते रुग्ण सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जातील…
🌹□बाकीच्या सर्व आजारांवर डॉक्टरानी कुणालाही सेवा नाकारू नये. या योजनेअंतर्गत सर्व ते उपचार करावेत…

About Shivshakti Times

Check Also

कोरोना नियमांचे पालन करून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न

कोरोना नियमांचे पालन करून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न शिवशक्ती टाइम्स न्यूज …

राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबणीवर

राज्यात 1 मे पासून लसीकरण सुरु होणार नाही राज्यात लसीकरण सुरु करण्यासाठी पुरेसा लसी उपलब्ध …

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबांना मोफत बियाणे, खते वाटप

मालेगाव तालुका ॲग्रो डिलर्स असोसिएशनच्या वतीने शेतकऱ्यांना करण्यात आलेल्या मदतीचा उपक्रम स्तुत्य : कृषी मंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *