दाक्षिणात्य अभिनेत्री चित्रा हिच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीला अटक
शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी युसूफ पठाण
दाक्षिणात्य अभिनेत्री चित्रा हिच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे.
चित्राच्या आईने तिच्या पतीने आपल्या मुलीची मारहाण करुन हत्या केल्याचा आरोप केला होता.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहलावातून मृत्यू आत्महत्येमुळे झाल्याचं निष्पन्न झालं असून आर्थिक समस्यांमुळे आत्महत्या केल्याची शक्यता तपासात समोर येत आहे.
चित्राचा पती हेमनाथ याच्यावर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.
२९ वर्षीय चित्राचा १० डिसेंबरला हॉटेलमध्ये मृतदेह आढळला होता.
काही महिन्यांपूर्वीच चित्राचं लग्न झालं होतं.
काही मालिकांमध्ये चित्राने बोल्ड सीन दिल्याने हेमनाथ नाराज होता असं तपासात समोर आलं आहे.
“हेमनाथला तिने टी.व्ही. मालिकेत दिलेला सीन आवडला नव्हता. ज्या दिवशी चित्राचा मृत्यू झाला, त्यादिवशी त्याने दिला धक्काही दिला होता,” अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त सुदर्शन यांनी एऩ.डी.टी.व्ही.शी बोलताना दिली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून हेमनाथची चौकशी सुरु होता.
चित्राचे मित्र आणि सेटवरील सहकाऱ्यांचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती.
गेल्या आठवड्यात रात्री उशिरा शूटिंग संपल्यानंतर चित्रा आणि हेमनाथ हॉटेलमध्ये गेले होते.
चित्राने स्वत:ला लॉक करुन घेतलं होतं.
हॉटेल कर्मचाऱ्यांकडून डुप्लिकेट चावीच्या सहाय्याने रुम उघडून पाहिली असता तिचा मृतदेह आढळला असं हेमनाथने पोलिसांना सांगितलं होतं.
‘पांडियन स्टोर्स’ या मालिकेतील चित्राची भूमिका विशेष गाजली होती.
या मालिकेत तिने मुलई ही भूमिका साकारली होती.
या मालिकेमुळे चित्रा प्रकाशझोतात आली होती.