Breaking News

सरकारने माझी पत्नी शोधून द्यावी ?? योगी आदित्यनाथांकडे तरुणाने केली मागणी

योगी आदित्यनाथांकडे तरुणाने केली मागणी……..

उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यातील एक बी.एस.सी.च्या विद्यार्थ्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे एक विनंती केली आहे.
या तरुणाने मुख्यमंत्र्यांना उद्देशून तयार केलेल्या एका व्हि.डी.ओ.मध्ये हात जोडून मी तुम्हाला माझी पत्नी शोधून देण्याची विनंती करतो असं म्हटलं आहे.
या तरुणाने उच्च जातीमधील तरुणीशी प्रेम विवाह केला होता.
त्यानंतर आपल्या पत्नीला तिच्या सासरचे लोकं उचलून घेऊन गेल्याचा आरोप या तरुणाने केला आहे.
तेव्हापासून हा तरुण पत्नीशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असला तरी तिच्याशी त्याचा संपर्क होऊ शकलेला नाही.
त्यामुळेच माझ्या पत्नीची हत्या झाल्याची मला शंका आहे असंही या तरुणाचं म्हणणं असून या प्रकरणामध्ये सरकारने लक्ष घालावं अशी मागणी त्याने केली आहे.
इतकचं नाही तर मुलीचे नातेवाईक आपलीही हत्या करु शकतील अशी भीती त्याने बोलून दाखवली आहे.
आपल्या पत्नीशी संपर्क करण्याचा तिला शोधण्याचा प्रयत्न करुन थकलेल्या या तरुणाने योगी आदित्यनाथ यांना हात जोडून विनंती केली आहे.
या तरुणाने मुलीबरोबर लग्न झाल्यानंतरचा तिचा एक व्हि.डी.ओ.ही व्हायरल केला आहे.
ज्यामुळे या तरुणीने आपल्या जीवाला नातेवाईकांकडून धोका असल्याचं म्हटलं आहे.
हे दोघेही बागपतमधील मुकुंदपुर ओवटी गावातील रहीवाशी आहेत.
मुलाचं नाव कुलदीप असून मुलीचं नाव प्रिया आहे.
दोघेही एकाच गावातील राहणारे असून मागील अनेक वर्षांपासून त्यांचं प्रेमप्रकरण सुरु होते.
दोन महिन्यांपूर्वी दोघांनीही घरातून पळून जाऊन नोंदणी पद्धीतने लग्न केलं.
दोघेही एकत्रच राहत होते.
त्यानंतर या मुलीच्या नातेवाईक तिला घेऊन गेल्याचा आरोप कुलदीपने केला आहे.

About Shivshakti Times

Check Also

अखेर अर्णव गोस्वामींना सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर

प्रतिनिधी – युसूफ पठाण (शिवशक्ती टाइम्स न्यूज) अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामींना …

माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा तपशील प्रसिद्ध केल्याप्रकरणी चौकशीचे आदेश……

प्रतिनिधी- युसूफ पठाण शिवशक्ती टाइम्स न्यूज साडेचार हजारांहून अधिक माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा वैयक्तिक तपशील अधिकृत …

फक्त ८,९९९ रुपयात लाँच झाला रेडमी-९ , ….! सुंदर लुकसह ५०००mAh बँटरी…! जाणून घ्या

शिवशक्ती टाईम्स न्यूज – मुंबई ⭕- शाओमीने आपला नवीन स्वस्त फोन रेडमी 9 भारतात लॉन्च …

Leave a Reply

Your email address will not be published.