शिवशक्ती टाइम्स न्यूज
प्रतिनिधी- युसूफ पठाण
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पदभार स्वीकारल्यापासून शहरातील अवैध धंदे हद्दपार झाल्याचं दिसत आहे.
यासाठी सामाजिक सुरक्षा पथक ही तयार करण्यात आलं.
असं असताना शहर वाहतूक नियंत्रण विभागातील एक महिला पोलीस अंमलदार लाच घेत असल्याचा एक व्हि.डी.ओ. समोर आला आहे.
पिंपरीतील शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील महिला पोलीस अंमलदार या शहर वाहतूक नियंत्रणशाखेच्या पोलीस अधिकारी जवळ असताना त्यांची नजर चुकवून लाच घेत असल्याचं या व्हि.डी.ओ.त दिसत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध धंदे, बेकायदा दारू विक्री, गुटखा विक्री, अशा प्रकरणावर पायबंद घालण्यात पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना यश आले आहे.
परंतु अशातच शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील एक महिला पोलीस अंमलदार लाच स्वीकारत असल्याचा एक व्हि.डी.ओ. समोर आला आहे.
शहरातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून पिंपरीला पाहिलं जातं.
याच ठिकाणी बाजारपेठ असल्याने मोठी वाहतुककोंडी होत असते.
दररोज सायंकाळच्या सुमारास शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी कार्यरत असतात.
मात्र, एका शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या महिला पोलीस अंमलदाराने महिला चालकांकडून दुचाकीवरील कारवाई टाळण्यासाठी लाच घेतल्याचं व्हि.डी.ओ.मध्ये दिसत आहे.
इतरांची नजर चुकवून पाठीमागच्या खिशात पैसे टाकल्याचंही व्हि.डी.ओ.मध्ये स्पष्ट दिसत आहे.
दरम्यान, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंठे यांना संबंधित प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.
यात सत्यता आढळल्यास शहर वाहतुक नियंत्रण शाखेतील महिला पोलीस अंमलदावर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.
तर, यासंबंधी संबंधित शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलीस अंमलदारास यांना लेखी खुलासा द्यावा, असे आदेशही देण्यात आले आहेत.