Best Practices in C.C.T.N.S. and I.C.J.S. प्रणालीतील वैयक्तिक उत्कृष्ट कामगीरी मध्ये पोह/1465 इकबाल अ. रशिद शेख महाराष्ट्र राज्यात व्दितीय.
शिवशक्ती टाइम्स न्यूज
प्रतिनिधी- युसूफ पठाण
केंद्रीय गुन्हे अभिलेख केंद्र, नवी दिल्ली यांचेकडून सन 2020 मध्ये Best Practices in C.C.T.N.S. and I.C.J.S. प्रणालीमध्ये वैयक्तिक उल्लेखनीय कामगिरी करणा-या अधिकारी व कर्मचारी यांना प्रशस्तीपत्रक व बक्षीस देण्यात येते.
सदर स्पर्धेमध्ये पोलीस हवालदार 1465 इकबाल अ. रशिद शेख, सी.सी.टी.एन.एस. विभाग सोलापूर ग्रामीण यांनी महाराष्ट्र ज्यातून व्दितीय क्रमांक पटकवून कोल्हापूर परिक्षेत्र व सोलापूर ग्रामीण जिल्हयाचे नाव महाराष्ट्र राज्यात लौकीकास आणले आहे.
त्याबद्दल कोल्हापूर परिक्षेत्र चे विषेश पोलीस महानिरीक्षक श्री. मनोजकुमार लोहीया सो यांनी पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथे पार पडलेल्या वार्षीक गुन्हे आढावा बैठकीमध्ये पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देवून गौरव केले आहे.
सदर बैठकीमध्ये श्रीमती तेजस्वी सातपूते पोलीस अधिक्षक, श्री. अतूल झेडे अप्पर पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण व सर्व वरिष्ठ अधिकारी व सोलापूर ग्रामीण जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
पोलीस हवालदार 1465 इकबाल अ. रशिद शेख यांनी यापूर्वीही अनेक स्पर्धेमध्ये भाग घेवून 8 सुवर्ण, 7 रौप्य व 10 कास्य पदकांसह भारत देशात प्रथम क्रमांक येण्याचा मान मिऴविलेला आहे.
त्याबद्दल महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी शुभेच्छासह कौतुकाचा वर्षाव केला आहे.
महाराष्ट्र राज्यात सन 2020 मध्ये सदर स्पर्धेचे आयोजन राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडून दिनांक 23 अक्टोंबर 2020 रोजी करण्यात आले होते व निवड करण्यात आलेल्या स्पर्धकांची गुणवत्ता तपासणी परिक्षा श्री. रंजन कुमार शर्मा सो, विषेश पोलीस महानिरीक्षक, यांचे अध्यक्षतेखाली श्री. संदिप दिवान सो. पोलीस अधिक्षक, श्रीमती बर्गे सो पोलीस अधिक्षक व श्री. कदम पोलीस उपधिक्षक सो यांचे समीती मार्फत घेण्यात आली होती.
त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातून पोह/1465 इकबाल अ. रशिद शेख सी.सी.टी.एन.एस. विभाग, सोलापूर ग्रामीण यांनी व्दितीय क्रमांक पटकविला आहे.
मा. श्री. रंजन कुमार शर्मा सो, विषेश पोलीस महानिरीक्षक गुन्हे अन्वेशण विभाग, तथा समन्वय अधिकारी सी.सी.टी.एन.एस. प्रकल्प महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी डिसेंबर 2020 मध्ये केंद्रीय गुन्हे अभिलेख केंद्र, नवी दिल्ली येथे होणा-या स्पर्धेकरीता महाराष्ट्र राज्यातून वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी करणा-या अधिकारी व कर्मचारी मध्ये पोलीस हवालदार 1465 इकबाल अ. रशिद शेख सी.सी.टी.एन.एस. विभाग, सोलापूर ग्रामीण यांचे महाराष्ट्र राज्यातून निवड करून केंद्रीय गुन्हे अभिलेख केंद्र, नवी दिल्ली यांचेकडे डिसेंबर 2020 मध्ये केंद्रीय स्तरावरील होणा-या स्पर्धेकरीता नामनिर्देषन पाठविण्यात आलेले आहे.