Breaking News

हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट, पोलिसांनी हॉटेल केलं सील……

शिवशक्ती टाइम्स न्यूज

प्रतिनिधी- युसूफ पठाण

आय.टी. हब म्हणून ओळख असलेल्या हिंजवडीत गेल्या काही महिन्यापासून सेक्स रॅकेटचा सुळसुळाट होता.
मात्र पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी हातात सूत्रे घेतल्यानंतर अनेक बदल दिसत आहे.
नुकतंच एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर छापा टाकून चार महिलांची सुटका करण्यात आली होती.
या प्रकरणी काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर सेक्स रॅकेट सुरू असलेले हॉटेल हिंजवडी पोलिसांनी सहा महिन्यांसाठी सील करत सेक्स रॅकेट विरोधात कठोर पाऊल उचलली आहेत.
ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पाहिल्यांदाच झाली आहे.
या प्रकरणी गणेश कैलास पवार, युसूफ सरदार शेख, समीर उर्फ राज तय्यब सय्यद आणि हिरा नावाच्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आय.टी. हब हिंजवडीमधील हॉटेल ग्रँड मन्नतवर काही महिन्यांपासून हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट सुरू होते.
त्यावर गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने काही दिवसांपूर्वी छापा टाकून चार तरुणींची सुटका करत चार जणांवर गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी पाठपुरावा करत संबंधित हॉटेल हे सहा महिण्याकरिता सील करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे पाठविण्यात आला होता.
त्यानुसार, कायदेशीर तरतुदी तपासून सेक्स रॅकेट चालत असलेले हॉटेल सहा महिने बंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिले आहेत.
त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी ते हॉटेल सील केले आहे.
हिंजवडी परिसरात असे गैरप्रकार आढळल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी नागरिकांना केले आहे.

About Shivshakti Times

Check Also

कोरोना नियमांचे पालन करून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न

कोरोना नियमांचे पालन करून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न शिवशक्ती टाइम्स न्यूज …

राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबणीवर

राज्यात 1 मे पासून लसीकरण सुरु होणार नाही राज्यात लसीकरण सुरु करण्यासाठी पुरेसा लसी उपलब्ध …

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबांना मोफत बियाणे, खते वाटप

मालेगाव तालुका ॲग्रो डिलर्स असोसिएशनच्या वतीने शेतकऱ्यांना करण्यात आलेल्या मदतीचा उपक्रम स्तुत्य : कृषी मंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *