Breaking News

ग्रामपंचायतीवर भगवा फडकलाच पाहिजे – संपर्कप्रमुख आनंदजी जाधव

प्रत्येक ग्राम पंचायत शिवसेना लढवनार – सचिन मुळूक

शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशावरून व पर्यावरण मंत्री तथा युवासेना प्रमुख मा.आदित्य ठाकरे साहेब यांच्या सुचनेनुसार संपर्क नेते मा.खा.चंद्रकांत खैरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात आज दिनांक -२५ डिसेंबर २०२० रोजी शिक्षक पतपेढी केज येथे बीड जिल्हा शिवसेनेची बैठक संपर्कप्रमुख आनंदजी जाधव साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हा प्रमुख सचिनजी मुळुक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
बैठकीला मार्गदर्शन करताना संपर्क प्रमुख आनंदजी जाधव साहेब यांनी शिवसैनिकांना ग्रामपंचायतच्या निवडणुकीत भगवा फडकविण्याकरीता शिवसैनिकांनी कामाला लागावे असे आवाहन करुन आदेश दिले.
तसेच येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येक शिवसैनिकांनी,पदाधिकाऱ्यांनी गावनिहाय नियोजन करुन शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्याकरिता जोमाने काम करावे व ग्रामपंचायत निवडणुकीत जास्तीत जास्त शिवसेनेचे सदस्य निवडुन आणत ग्रामपंचायतचे सरपंच सर्वात जास्त शिवसेनेचे करावे असे आवाहन केले.तसेच जिल्हा प्रमुख सचिनजी मुळुक यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर भगवा फडकविण्यासाठी या निवडणुकीत खारीचा वाटा उचलावा असे आवाहन केज, अंबाजोगाई,परळी,धारुर, वडवणी,माजलगाव या सहा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांन केले.
यावेळी बैठकीला सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब अंबुरे, महिला आघाडी सहसंपर्कप्रमुख सौ.रत्नमालाताई मुंडे,म.आ.जि.प्र.चंद्रकलाताई बांगर,वि.से.जि.प्र.अतुल दुबे, उपजिल्हाप्रमुख पप्पु ठक्कर,सुशिल पिंगले,रामराजे सोळंके तसेच केज तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे,अंबाजोगाई तालुका प्रमुख अर्जुन वाघमारे,परळी तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे,धारुर बाळासाहेब कुरुंद,वडवणी संदिप माने, माजलगाव तालुका प्रमुख अप्पासाहेब जाधव,माजी उपनगराध्यक्ष राज पांडे,माजी उपजिल्हाप्रमुख शिवाजी दादा कुलकर्णी,शहरप्रमुख अनिल बडे,राजेश विभुते,गजानन मुडेगावर,पापा सोळंके,शिनगारे, युवासेना तालुका प्रमुख अरविंद थोरात,बाबासाहेब चाटे,अक्षय भुमकर,तात्या रोडे,शुभम ढाके, अभिजीत घाटुळ,रामहरी कोल्हे,महाराणा घोळवे,महादेव गित्ते,मनोरमाताई डोईफोडे,आशाताई वाघमारे, कळसकर,दिलीप जाधव,विकास रोडे,अशोक जाधव,आश्रब शेख,राम जाधव,पप्पु ढगे,विकास काशिद,बापु गोरे,बाळासाहेब पवार,बापु पटाईत,लक्ष्मण गलांडे,शुभम महाकुंडे,विकी शिंदे,आकाश बहिर,फुके पाटिल,बप्पा जाधव,आत्तम घाडगे,ज्ञानेश्वर शेळके,ज्ञानेश्वर बोबडे,अविनाश करपे,रामभाऊ पवार,अभिमन्यु वैष्णव व,राहुल घोळवे,सह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते‌.

About Shivshakti Times

Check Also

मालेगावी १० तलवारींसह चौघे ताब्यात

शहर पोलिस उपअधीक्षक यांच्या विशेष पथकाची कारवाई शिवशक्ती टाइम्स न्यूज मालेगाव : प्रतिनिधी शहरातील रमजानपुरा …

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️ चलन अथवा दंडाची रक्कम जागीच भरण्याबाबत जबरदस्ती करू नये,” …

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी -युसूफ पठाण मुख्यमंत्री उद्धव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *