कृषीमंत्री दादा भुसे यांनी कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचा सल्ला.*
*👉🏻 शिवसेना नेते आणि राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्वीट करत त्यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. मला कोरोनाची लागण झाली असून संपर्कात आलेल्या सगळ्यांनी काळजी घ्यावी असा सल्ला दादा भुसे यांनी दिला आहे. तर सध्या त्यांची प्रकृती ठीक असून लवकरच ते बरे होऊन कामावर रुजू होतील असंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
ट्वीटमध्ये काय म्हणाले दादा भुसे?
‘माझी कोविड- १९ चाचणी पॉझिटिव्ह आली असून, माझ्या संपर्कात आलेल्यांनी कृपया तपासणी करून घ्यावी. आपणा सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळे माझी प्रकृती उत्तम आहे. कोरोनावर यशस्वी मात करून लवकरच मी आपल्या सेवेत रूजू होईन.’