शिवशक्ती टाइम्स न्यूज
प्रतिनिधी – राजेश सोनवणे
बेळगाव ता. अथणी : सध्या ऊस हंगाम सर्वत्र सुरू असून ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टरही रस्त्यावर दिसत आहेत. मात्र बेळगाव जिल्ह्यामध्ये एका ट्रॅक्टरची चर्चा सुरू आहे. या ट्रॅक्टरला चक्क एका पाठोपाठ अशा तब्बल 12 ट्रॉल्या लावल्या. यामुळे ट्रॅक्टरचा मालक चांगलाच चर्चेत आला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अथणी – हारुगेरी रस्त्यावर कंकणवाडीतून 12 ट्रॉली बेकायदा ऊस भरून ट्रॅक्टर मंगळवारी (26 जानेवारी) सायंकाळी निघाला होता. केंपवाड साखर कारखान्याला जाणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करून 6 जणांविरोधात अथणी पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कंकणवाडी (ता. रायबाग) येथून 120 टन वजनाच्या 12 ट्रॉली (KA 23 T 7482) घेऊन हणमंत रामाप्पा हुक्केरी (रा. कंकणवाडी, ता. रायबाग) निघाला होता. त्याने 6 मालकांचा 12 ट्रॉलीत ऊस भरला होता.
मंगळवारी सायंकाळी ट्रॅक्टर – ट्रॉली घेऊन जात होता. मंडल पोलिस निरीक्षक शंकरगौड बसगौडर यांनी वाहने अथणीत पकडून कारवाई केली. कंकणवाडीहून हारूगेरी, शंकरट्टी, दरूरनंतर अथणीत आल्यावर पोलिसांनी ट्रॅक्टर जप्त केले. याप्रकरणी राजू आदाप्पा बिस्टाने (रा. बनजवाड, ता. कागवाड), विठ्ठल रामाप्पा मालदिनी, रवी हालाप्पा कनडी, हालाप्पा रामाप्पा हुक्केरी, लक्ष्मण बसप्पा हेगडे, हालाप्पा गंगाप्पा मुडलगी (सर्व रा. कंकणवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला.
वाहतुकीचे सर्व नियम पायदळी तुडवत या ट्रॅक्टरने प्रवास सुरू केला आहे. मात्र त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. तर दुसऱ्या बाजूला वळणावर योग्यरित्या ही ट्रॅक्टर ट्रेन हाताळणाऱ्या ड्रायव्हरचे मात्र कौतुक केले जात आहे. या व्हिडिओची चर्चा सध्या कर्नाटक राज्यात जोरदार सुरू असून प्रत्येक जण हा ट्रॅक्टर ट्रेन बघून अवाक् झाला आहे.
मार्गावरून 1) KA 23 TA 2968, 2) KA 23 TA 2969, 3) KA 23 T 4) 4984, चेसी नं. व्हीआर 214-2006. 5) KA 23 BD 1204, 6) KA 23 BD 1203, 7) KA 23 TA 1607, 8) KA 23 TA 1606, 9) चेसी नं. 967/2021, 10) चेसी नं. 966/2021, 11) केए 48 टी 1371, 12) KA 23 9732 या ट्रॉली एकामागून एक जोडून ऊस भरून निघाल्या होत्या. अर्धा किलोमीटर रस्ता ट्रॉलींनी व्यापल्याने वाहतुकीस अडचण झाली होती.