Breaking News

मालेगाव महापालिकेतील लेट लतिफ कर्मचारींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत-आयुक्त त्रंबक कासार यांची धडक कारवाई.

मनपा: मालेगाव महापालिकेतील लेट लतिफ कर्मचारींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत, अनोख्या गांधीगिरी सह एक दिवसाचे वेतन कपात.
आयुक्त त्रंबक कासार यांची धडक कारवाई.

मालेगाव महापालिकेतील 55 लेट लतिफ – उशिरा कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आयुक्त त्र्यंबक कासार यांनी गुलाब पुष्प देऊन मुख्य प्रवेशद्वारावरच त्यांचे स्वागत केले. गुलाब पुष्प देण्याच्या गांधीगिरी सह त्यांची एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे निर्देशही आस्थापना विभागास दिले आहेत. त्यामुळे उशिरा येणाऱ्या कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

म.शासनाने पाच दिवसाचा आठवडा केल्यामुळे शनिवारी व रविवारी सुट्टी असते त्यामुळे कार्यालयीन कामकाजाची नियमित वेळ पाच दिवसाचा आठवडा करताना वाढविण्यात आलेली आहे. शासकिय कार्यालयीन कामकाजाची वेळ ही सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 अशी आहे. परंतु शासकीय कार्यालयातील बऱ्याच अधिकारी कर्मचारी यांना अजूनही जुन्या सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 या कार्यालयीन वेळेची ओढ व सवय आहे.

हे जाणून स्वतः सकाळी दहा वाजेच्या आत महापालिकेत हजर होणाऱ्या आयुक्त त्रंबक कासार यांनी लेट लतिफ कर्मचाऱ्यांवर एक दिवसाचे वेतन कपातीच्या प्रशासकीय कारवाई सह नियमित वेळेवर कामावर येण्यासाठी गुलाब पुष्प देऊन मुख्य प्रवेश द्वारावर उशिरा कामावर येणाऱ्यांची स्वागत केले. जेणे करून उक्त कर्मचारी यांना आपल्या कामाची वेळेची व जबाबदारीचे भान असावे. यासाठी आयुक्त त्रंबक कासार यांनी प्रथम महापालिका मुख्यालयातील सर्व कार्यालयांना सकाळी दहा वाजे पूर्वी भेट देऊन हजेरी मस्टर ची तपासणी केली. बहुतांश जबाबदार कर्मचारी अधिकारी गैरहजर आढळून आल्याने हजेरी मस्टर आपल्या ताब्यात जमा करून. आज दी.29 जानेवारी रोजी सकाळी 10.00 वाजे पासून ते 10.55 पर्यंत आयुक्त स्वतः महापालिका मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर खुर्ची टाकून आस्थापना पर्यवेक्षक यांच्यासह ठाण मांडून बसले आणि उशिरा आलेल्या प्रत्येक महिला व पुरुष अशा सर्व प्रकारच्या कायम व मानधन अधिकारी कर्मचारी यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. उशिरा येणाऱ्या एकूण 55 कर्मचाऱ्यांमध्ये 32 कायम तर 23 मानधन कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यात बरीचाशी जबाबदार अधिकारीही मंडळी ही सुटलेली नाहीत. यावेळी आयुक्तांनी मास्क न वापरणाऱ्यांना ही तंबी देऊन लगेच मास्क लावायला ही लावले. आयुक्तांच्या या कारवाईवेळी मनपाचे सर्व व प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते तरीही काही महाभागांनी इतर माध्यम व खिडक्यांमधून प्रवेश करण्याचा निष्फळ प्रयत्न केला.

About Shivshakti Times

Check Also

12 ते 23 मे दरम्यान जिल्ह्यात कडक लॉकडाऊन : पालकमंत्री छगन भुजबळ

जनतेच्या पूर्ण सहकार्याने कोरोनाची लढाई जिंकण्याचा विश्वास: पालकमंत्री छगन भुजबळ शिवशक्ती टाइम्स न्यूज – मुख्य …

‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’

सारथी फाउंडेशन तर्फे सामाजिक बांधिलकी जपत नाशिक येथे महारक्तदान  शिबीर संपन्न शिवशक्ती टाइम्स न्यूज नाशिक …

नाशिक व मालेगाव महापालिकेसह ग्रामीण भागासाठी स्वतंत्र मदत आणि माहिती कक्ष कार्यान्वित;

आपापल्या कार्यक्षेत्राप्रमाणे रुग्णालयांनी मदत कक्षाकडून माहिती घेवून ऑक्सिजन प्राप्त करून घ्यावा-जिल्हाधिकारी सूरज मांढरे शिवशक्ती टाइम्स …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *