Breaking News

कोरोना लसीकरणासाठी पत्रकारांना प्राधान्य करून द्या.. मुख्यमंत्र्याकडे केली मराठी पत्रकार परिषदेची मागणी !

शिवशक्ती टाइम्स न्यूज :
पत्रकार युसूफ पठाण

मुख्य संपादक – जयेश दाभाडे (सोनार )

कोरोनाच्या कठीण काळात पत्रकारांनी जीव धोक्यात घालून वृत्तांकन करून सरकार व यंत्रणेला सहकार्य केले, आजही पत्रकार या परिस्थितीतही काम करत आहे. या काळात राज्यातील अनेक पत्रकारांना कोरोनामुळे जीव सुद्धा गमवावा लागला. सध्या राज्यभर लसीकरण सुरू आहे. त्यात आरोग्यसेवा व पोलीस यंत्रणा या फ्रन्टलाइनवर काम करणाऱ्यांचा प्राधान्यक्रमाने विचार करण्यात आला, तोच विचार पत्रकारांचाही करण्यात यावा व कोरोना लसीकरणात पत्रकारांना प्राधान्य देण्यात यावे..अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेशी संलग्नित बुलडाणा जिल्हा पत्रकार संघ व बुलडाणा टीव्ही जनरॅलिस्ट असोसिएशनने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे हे आज शुक्रवार 5 फेब्रुवारी रोजी लोणार येथे सरोवराची पाहणे व आराखड्यासंदर्भात बैठक घेण्यासाठी आलेले असताना सरोवराच्या काठावर पत्रकारांनी त्यांना हे मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण जैन, जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष वसीम शेख, पत्रकार सिद्धेश्वर पवार सिद्धार्थ आराख अजय बिल्लारी, नितीन कानडजे, संदीप शुक्ला, कासिम शेख, निलेश राऊत, गणेश सोळंकी, निलेश जोशी, दीपक मोरे, मयूर निकम आदींसह लोणार शहर व परिसरातील पत्रकार उपस्थित होते.
कोरोना लसीसंदर्भातला क्रम ठरलेला असून लसी ज्या-ज्या प्रमाणात उपलब्ध होतील.. त्या-त्या प्रमाणात लसीकरणाचे प्रमाणही वाढवण्यात येईल व कोणीही लसीकरणापासून वंचित राहणार नाही, असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

About Shivshakti Times

Check Also

मालोजी राजे गढीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देणार -सांस्कृत‍िक कार्य मंत्री अमित देशमुख

मालोजी राजे भोसले गढी दुरूस्ती व संवर्धनाबाबत आढावा बैठक शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ …

नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलमधून दीड वर्षांचे बाळ पळविले; भामटा सीसीटीव्हीत कैद

*नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलमधून दीड वर्षांचे बाळ पळविले; भामटा सीसीटीव्हीत कैद !*  शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी …

स्वत:चा सख्खा भाऊ १२ वर्षे राज्याचा गृहमंत्री असतानाही…;

आर. आर. पाटलांच्या भावाचं अजित पवारांकडून कौतुक…. सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांचा उपमुख्यमंत्री अजित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *