Breaking News

स्वत:चा सख्खा भाऊ १२ वर्षे राज्याचा गृहमंत्री असतानाही…;

आर. आर. पाटलांच्या भावाचं अजित पवारांकडून कौतुक….

सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार

शिवशक्ती टाइम्स न्यूज : पत्रकार युसूफ पठाण

मुख्य संपादक – जयेश दाभाडे (सोनार )

दिवंगत आर. आर. पाटील हे १२ वर्ष गृहमंत्री होते.
त्यांचे सख्खे बंधू सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील हे गृहामंत्र्यांचा भाऊ म्हणून कधीच मिरवले नाहीत.
ते अत्यंत संयमी आणि शांत व्यक्ती आहेत, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर. आर. पाटील यांच्या भावाच्या साध्या रहाणीमानाचं कौतुक पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये केलं.
एखाद्याचा लांबून गृहमंत्री नातेवाईक असला तरी सर्व डिपार्टमेंट चालवत असतो असा संदर्भ यावेळी अजित पवारांनी देताच सभागृहात एकच हशा पिकला.
राजाराम पाटील यांनी भाऊ गृहमंत्री असताना देखील वीस वर्षे साईड ब्रँचला काम केलं.
राजराम पाटील हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात दीड वर्ष झालं सहाय्यक पोलीस आयुक्त या पदावर कार्यरत असून त्यांची नुकतीच बदली झाली आहे.
त्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तेव्हा, अजित पवार यांनी आर. आर. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला.
ते, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सेवा उपक्रम, एक्स ट्रॅकर उपक्रम, विविध सोशल मीडिया पेजेस शुभारंभ तसेच स्मार्ट पोलीस ठाणे प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम प्रसंगी अजित पवार बोलत होते.
उपमुख्यमंत्री म्हणाले की, सहाय्यक पोलीस आयुक्त राजराम रामराव पाटील त्यांच्या नवाचा शॉर्टफॉर्म देखील आर.आर. पाटील आहे.
आर. आर. पाटील आणि आम्ही १९९० पासून एकत्र काम करत होतो.
सभागृहात एकाच बेंच वर बसायचो.
दुर्दैवाने आर. आर. पाटील लवकर सोडून गेले.
ते त्याही वेळेस गृहमंत्री होते.
सर्वाधिक १२ वर्ष ते गृहमंत्री राहिले.
त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले.
त्याही वेळेस पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त राजराम पाटील हे अधिकारी होत.

About Shivshakti Times

Check Also

कोरोना नियमांचे पालन करून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न

कोरोना नियमांचे पालन करून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न शिवशक्ती टाइम्स न्यूज …

राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबणीवर

राज्यात 1 मे पासून लसीकरण सुरु होणार नाही राज्यात लसीकरण सुरु करण्यासाठी पुरेसा लसी उपलब्ध …

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबांना मोफत बियाणे, खते वाटप

मालेगाव तालुका ॲग्रो डिलर्स असोसिएशनच्या वतीने शेतकऱ्यांना करण्यात आलेल्या मदतीचा उपक्रम स्तुत्य : कृषी मंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *