Breaking News

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ येथील राष्ट्र सेवा दल व समविचारी संघटनांच्या वतीने आंदोलन

शिवशक्ती टाइम्स न्यूज :

मालेगाव- दिल्ली येथील सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ येथील राष्ट्र सेवा दल व समविचारी संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात येऊन घोषणा देण्यात आल्या.
प्रारंभी येथील मोसम पुलावरील गांधी पुतळ्याला जेष्ठ सेवा दल सैनिक अशोक पठाडे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगर प्रमुख दिनेश ठाकरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात येऊन शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध करण्यात आला.
यावेळी राष्ट्र सेवा दलाचे राज्य संघटक नचिकेत कोळपकर, जिल्हा संघटक रविराज सोनार, अॅड मनोज चव्हाण, राजीव वडगे, काॅंग्रेस ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मयूर वांद्रे, सोहेल डालरीया, शरिफ मन्सुरी, इम्रान रशीद, नफिस मेहता, नबाब मन्सुरी, साहिल मन्सुरी, वाजीद काॅम्रेड, बापू देवकाते, अन्सारी सर्जन, अकिल शेख, मुबस्सीर अन्सारी आदी यावेळी उपस्थित होते.

About Shivshakti Times

Check Also

भुकेल्याची भुक भागविण्याचे महत्वपूर्ण काम करते शिवभोजन केंद्र : कृषीमंत्री भुसे

सामान्य रुग्णालय परिसरात शिवभोजन केंद्राचे उद्घाटन शिवशक्ती टाइम्स न्यूज मालेगाव : प्रतिनिधी अल्प दरासह संकट …

माळमाथ्यावरील रस्त्याची दुरावस्था ग्रामस्थांनी केले खडयात वृक्षरोपण

मालेगाव : प्रतिनिधी  माळमाथ्यावरील गिगाव, रोंझाने, सिताने, खलाने, बोधे, माल्हणगाव या गावातील रस्त्यांची जीवघेणी दुरावस्था …

कृषिरत्न फाउंडेशनतर्फे आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे, खते व साडीचोळी कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते वाटप

सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील कृषिरत्न फाउंडेशनने कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या अनाथ कुटुंबांना तसेच आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *