प्रतिनिधी युसुफ पठाण
शिवशक्ती टाइम्स न्यूज
औरंगाबादः आता 1500 स्क्वेअर फुटांपर्यंत घर बांधण्यासाठी परवानगीची गरज नाही, अशी घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी केलीय. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज औरंगाबाद महापालिकेच्या अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नगरविकास विभागाच्या वतीने मोठा निर्णय घेतला गेला असून, 31 डिसेंबर 2020 पर्यंतची बांधकामे नियमित होतील, त्याचबरोबर 1500 स्क्वेअर फूट घर बांधायचे असेल तर महापालिकेची परवानगी घेण्याची गरज नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
*3 हजार स्क्वेअर फूट घरं बांधणाऱ्यांसाठी 10 दिवसांत परवानगीः एकनाथ शिंदे*
राज्यातील 55 हजार कुटुंबांना गुंठेवारीचा फायदा होणार असून, 3 हजार स्क्वेअर फूट घरं बांधणाऱ्यांसाठी 10 दिवसांत परवानगी देणार असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलं.