Breaking News

नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलमधून दीड वर्षांचे बाळ पळविले; भामटा सीसीटीव्हीत कैद

*नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलमधून दीड वर्षांचे बाळ पळविले; भामटा सीसीटीव्हीत कैद !*

 शिवशक्ती टाइम्स न्यूज

प्रतिनिधी युसुफ पठाण

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमधील सिव्हील हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आलेल्या एका आईची नजर चुकवत अज्ञात भामट्याने तिची दीड वर्षांची मुलगी पळवून नेल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.१३) घडली. हा प्रकार आणि पळवून नेणाऱ्या व्यक्तीचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
नाशिक शहरातील एक महिला आपल्या बहिणीसोबत दीड वर्ष वयाच्या मुलीला घेऊन सिव्हीलमध्ये नियमित तपासणीसाठी आली होती. यावेळी बाळाला बाहेरील बाकावर बसवून महिला तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेली होती. सदर महिलेच्या बहिणीचे लक्ष नसल्याची संधी साधत एका व्यक्तीने चपळाईने त्या मुलीला उचलून नेले. ही घटना लक्षात येताच महिलेने आरडाओरड केली.
मात्र, तोपर्यंत ही व्यक्ती निघून गेलेली होती. ही घटना घडली त्यावेळी सुरक्षारक्षक जेवणासाठी बसले होते. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सरकारवाडा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, हाती आलेल्या फुटेजवरुन तपास सुरू केला आहे.

About Shivshakti Times

Check Also

कोरोना काळात के.बी.एच.च्या विद्यार्थ्यांचे अनोखे उतरदायीत्व!

 आनंद प्रसाद या सामाजिक कार्याला  ५२,०००/-  रुपयांची आर्थिक मदत शिवशक्ती टाइम्स न्यूज- उपसंपादक आनंद दाभाडे …

राज्यातील पत्रकारांना तातडीने लस देण्यात यावी मंत्री छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी

पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन त्यांचे लसीकरण करणे गरजेचे-छगन भुजबळ शिवशक्ती टाइम्स न्यूज (प्रतिनिधी-युसूफ पठाण …

तिसऱ्या लाटेत बालकांना धोक्याची शक्यता अधिक असल्याने नियोजन करावे – पालकमंत्री छगन भुजबळ

रुग्णसंख्या कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधींचे योगदान महत्वाचे: पालकमंत्री छगन भुजबळ शिवशक्ती टाइम्स न्यूज –प्रतिनिधी युसूफ पठाण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *