शिवशक्ती टाइम्स न्यूज
प्रतिनिधी – युसूफ पठाण
जयपूर : लाच घेतल्याचा आरोप आणि त्यासाठी शिक्षा झालेली अनेक प्रकरणं आपण वाचतो.
इथं मात्र अधिकाऱ्यानं लाच घेतल्यानंतर त्या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं आहे.
या लाच घेतलेल्या बाईंचं आणि न्यायधीशांचंच प्रेम जमलं असून लग्नासाठी बाईंना जामिनही मिळाला आहे.
एका उपविभागीय न्यायधीश बाईंवर लाच घेतल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.
पिंकी मीणा असं त्यांचं नाव आहे.
हायवे बनवणाऱ्या कंपनीकडून १० लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
त्या सध्या तुरुंगात आहेत.
मात्र गंमत काय ?, तर पिंकी मीणा या १६ फेब्रुवारीला थेट न्यायाधीशांसोबतच लग्न करणार आहेत.
राजस्थान मे.उच्च न्यायालयाच्या जयपूर खंडपीठाचे न्यायाधीश इंद्रजीत सिंह यांनी पिंकी मीणा यांना त्यासाठीच १० दिवसांचा सशर्त जामीन दिला आहे.
दौसा इथं हायवे बनवणाऱ्या कंपनीकडून पैसे घेतल्याच्या आरोपात मागच्या २९ दिवसांपासून मीणा या घाटगेट जेलमध्ये बंद आहेत.