Breaking News

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर वाहनांची एकमेकांना धडक होऊन भीषण अपघात; ⭕ पाच जणांचा मृत्यू…..

शिवशक्ती टाइम्स न्यूज
प्रतिनिधी – युसूफ पठाण

मुबंई-पुणे एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात झाला आहे.
वाहनांनी एकमेकांना धडक देऊन झालेल्या या भीषण अपघाताच पाच जणांचा मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये एका पाच वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. पुण्याकडुन मुंबईच्या दिशेने जात असताना बोरघाट उतरताना फुडमॉलजवळ हा अपघात झाला.
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनरने इतर चार वाहनांना मागून धडक दिल्याने हा अपघात झाला.
कंटेनरने ट्रक, टेम्पो आणि दोन कारना मागून धडक दिली. अपघातात झुंझारे कुटुंबाचा मृत्यू झाला आहे.
हे कुटुंब नवी मुंबईत वास्तव्यास होतं.

⭕मृतांची नावं –
१) मंजू प्रकाश नाहर (५८),
२) डॉ. वैभव वसंत झुंझारे (४१), ३) उषा वसंत झुंझारे (६३),
४) वैशाली वैभव झुंझारे (३८), ५) श्रिया वैभव झुंझारे

⭕ जखमींची नावं –

१) स्वप्नील सोनाजी कांबळे (३०),
२) प्रकाश हेमराज नाहर (६५),
३) अर्णव वैभव झुंझारे (११),
४) किशन चौधरी (गंभीर जखमी),
५) काळूराम जमनाजी जाट (गंभीर जखमी)
दोन जखमींना अष्टविनायक (पनवेल) व अन्य दोघांना वाशी येथे म.न.पा. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
तर एका जखमी इतर रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

⭕ अपघातग्रस्त वाहनं –
कंटेनर R.J. 51.GB.2238,
इनोव्हा M.H.12. LX. 4599,
क्रेटा M.H. 47.AD.4025
टेम्पो M.H. 14.GD.3880,
ट्रक M.H. 14.P.6870

About Shivshakti Times

Check Also

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! याच महिन्यात सुरू होतेय बहुप्रतिक्षित सेवा,

प्रवासात अजिबात नाही येणार कंटाळा……. शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ पठाण दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेली …

सैन्य भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी तिघांना अटक ; परीक्षा रद्द……

सैन्य भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी तिघांना अटक ; ⭕ परीक्षा रद्द…… शिवशक्ती टाइम्स न्यूज’ प्रतिनिधी …

सर्वसामान्यांना पुन्हा झटका,…घरगुती गॅसच्या किंमती वाढल्या……

सर्वसामान्यांना पुन्हा झटका, ⭕चार दिवसांत दुसऱ्यांदा घरगुती गॅसच्या किंमती २५ रुपयांनी वाढल्या…… शिवशक्ती टाइम्स न्यूज’ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *