Breaking News

गांजा लागवड प्रकरणी परदेशी नागरिकांना पाच दिवसांची पोलीस कोठडी…

गांजा लागवड प्रकरणी परदेशी नागरिकांना पाच दिवसांची पोलीस कोठडी…

शिवशक्ती टाइम्स न्यूज
प्रतिनिधी – युसूफ पठाण

\वाई ः गांजा लागवड प्रकरणी परदेशी नागरिकांना मे.न्यायालयाने पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी काही स्थानिकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
त्यांच्याकडे याबाबत कसून चौकशी सुरू आहे.
दरम्यान या परदेशी युवकांच्या संपर्कातील काही जण परागंदा झाले आहेत.
रात्री नंदनवन पार्क सोसायटीतील एका रो हाऊस वर छापा टाकून पोलिसांनी दोन परदेशी युवकांना पारपत्र व रहिवास परवाना नसल्याप्रकरणी ताब्यात घेतले.
यावेळी घराची झडती घेत असताना घरामध्ये गांजा सदृश्य वनस्पतीची लागवड केल्याचे आढळून आले.
याबाबत खात्री करण्यासाठी पोलिसांनी पुण्याहून न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील तज्ञांना बोलावलेले होते.
त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली.
त्यांना मे.न्यायालयात हजर केले असता मे.न्यायालयाने शनिवार दिनांक २० फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पोलिसांना चौकशीमध्ये परदेशी युवक कोणतेही सहकार्य करत नसल्याचे सांगण्यात आले.
ही गांजा सदृश्य वनस्पती नसून औषधी वनस्पती असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे.
या परदेशी नागरिकांना घर उपलब्ध करून देणारे व त्यांच्या संपर्कात असणाऱ्या काही स्थानिकांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
तर पोलीस चौकशीसाठी बोलावतील व अटक करतील या भीतीने अनेक जण परागंदा झाल्याची माहिती मिळत आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे करत आहेत.

About Shivshakti Times

Check Also

महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनची विधानभवनात गृहमंत्र्यांसोबत बैठक संपन्न

पोलिस पाटीलांचे मानधन वाढीसह अनेक प्रश्न मार्गी लागणार शिवशक्ती टाइम्स न्यूज महाराष्ट्र राज्यातील पोलीस पाटील …

करोनाचा कहर… इंदोर मधील ज्वेलरी शॉपमधील ३१ कर्मचारी करोना पॉझिटिव्ह

इंदोर मधील ज्वेलरी शॉपमधील ३१ कर्मचारी करोना पॉझिटिव्ह ; खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचा शोध सुरू…… शिवशक्ती …

शिकार केलेल्या काळविटाचं मटण खाणं पडलं महागात; काय आहे नेमकं प्रकरण?

सोलापूर (प्रतिनिधी-युसूफ पठाण ) : सोलापुरात काळविटाची शिकार करणाऱ्या शिकाऱ्याकडून मटण विकत घेणे दोघांना चांगलेच …

Leave a Reply

Your email address will not be published.