जाणून घ्या कोण आहे शबनम आणि तिचा गुन्हा काय?
१५ एप्रिलच्या मध्यरात्री आपल्या घरातील सात जणांची हत्या केली.
शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी – युसूफ पठाण
स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका महिलेला फाशी दिली जाणार आहे.
उत्तर प्रदेशमधील मथुरा येथील तुरुंगामध्ये मूळची अमरोहा येथे असणाऱ्या शबनमला फासावर लटकवण्यात येणार आहे.
शबनमला फाशी देण्यासंदर्भातील तयारी तुरुंग प्रशासनाने सुरु केली आहे.
निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी देणाऱ्या मेरठच्या पवन जल्लादनेही या तुरुंगामधील फाशीघराची दोन वेळ पहाणी केली आहे.
फाशीची तारीख निश्चित करण्यात आलेली नसली तरी तुरुंग प्रशासनाच्या तयारी सुरु केल्याचे चित्र दिसत आहे.
अमरोहामध्ये राहणाऱ्या शबनमने २००८ साली प्रियकर सलीमच्या मदतीने स्वत:च्या सात नातेवाईकांवर कुऱ्हाडीने हल्ला करुन त्यांची हत्या केली होती.
या प्रकरणामध्ये मे.सर्वोच्च न्यायालयाने शबनमला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.
राष्ट्रपतींनीही शबनमचा दयेचा अर्ज स्वीकारलेला नाही.
त्यामुळेच आता तुरुंग प्रशासनाने शबनमला फाशी देण्याची तयारी सुरु केलीय.
⭕ नक्की काय घडलं त्या रात्री ?
अमरोहामधील हसनपूरजवळ असणाऱ्या बावनखेडी गावात राहणाऱ्या शबनमने सलीमच्या मदतीने २००८ साली १४ आणि १५ एप्रिलच्या मध्यरात्री आपल्या घरातील सात जणांची हत्या केली.
यामध्ये शबनमचे वडील मास्टर शौकत, आई हाश्मी, भाऊ अनीस आणि रशीद, वहिनी अंजूम आणि तिची बहीण रबीया या सहा जणांना समावेश होता.
शबनमने नंतर आपल्या लहान भाचालाही गळा आवळून मारुन टाकलं.
सलीमसोबत असणाऱ्या आपल्या प्रेमाला कुटुंबाचा विरोध असल्याने शबनमने संपूर्ण कुटुंबाची हत्या केली.
१०० दिवस सुनावणी आणि ६४९ प्रश्न अमरोह येथील मे.न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी दोन वर्ष तीन महिने चालली.