Breaking News

पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल ऑउट’…….

मुंबई पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल ऑउट’…….

शिवशक्ती टाइम्स न्यूज’

प्रतिनिधी युसूफ पठाण

शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी रात्री ‘ऑपरेशन ऑल ऑउट’ अभियान राबविले.
या अभियानांतर्गत शहरातील २१७ ठिकाणी कारवाई (कोम्बिग) करून ३८ फरार आरोपींना अटक करण्यात आली.
अमली पदार्थ कायद्यान्वये ८७ जणांवर कारवाई करण्यात आली, तर अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या ३२ जणांवर कारवाई करून त्यांच्याजवळील शस्त्र जप्त केली.
पोलिसांनी शहरात एकाच वेळी १४३ ठिकाणी नाकाबंदी करून १०७९५ वाहनांची तपासणी केली.
यातील २२६८ चालकांवर कारवाई करण्यात आली.
तर मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या ३१ जणांवरही पोलिसांनी कारवाई केली.
शहरातील मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी, पायी गस्त, हॉटेलांची झडती, वस्त्यांमध्ये तपासणी करून पोलिसांनी अभिलेखावरील गुन्हेगारांवर जरब बसविली.
कारवाईत पाच प्रादेशिक विभागांचे अतिरिक्त आयुक्त, १३ परिमंडळांचे उपायुक्त, विभागीय सहाय्यक आयुक्त, सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि अंमलदार सहभागी झाले होते.
रात्री ११ ते पहाटे २ पर्यंत पोलिसांनी ही कारवाई केली.
दरम्यान पोलिसांनी संवेदनशील आणि मर्मस्थळे असलेल्या ५१२ ठिकाणांची तपासणी करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या.
मुंबई सागरी सीमा सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ५४ लँडींग पॉँईंटची सुरक्षा व्यवस्था सतर्क करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

⭕कारवाई अशी…….

कारवाईत पोलिसांनी अभिलेखावरील १४५७ आरोपींची तपासणी केली.
यात ४६५ आरोपी आढळले. तर अजामीनपात्र वॉरंटमधील १७५ जणांना अटक केली.
बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने ९५१ हॉटेल, निवासी हॉटेल व अन्य आस्थापनांची तपासणी केली.
शहरात अवैधरित्या सुरू असलेल्या दारू आणि जुगाराच्या ५४ ठिकाणांवर छापे घातले.

About Shivshakti Times

Check Also

राज्यमंत्री बच्चू कडूंच्या नावे चिठ्ठी लिहुन शेतकऱ्याची आत्महत्या, पोलीस अन् व्यापाऱ्यांनी मारहाण केल्याचे नमुद

शिवशक्ती टाइम्स न्यूज  प्रतिनिधी युसूफ पठाण अमरावती : संत्र्याच्या व्यवहारात व्यापाऱ्याने केलेली फसवणूक व त्यापाठोपाठ …

पोलीस हवालदार इकबाल अ. रशिद शेख महाराष्ट्र राज्यात व्दितीय.

Best Practices in C.C.T.N.S. and I.C.J.S. प्रणालीतील वैयक्तिक उत्कृष्ट कामगीरी मध्ये पोह/1465 इकबाल अ. रशिद …

जमिनीच्या वादातून भूखंड व्यावसायिका गुड्ड तिवारीचा खून,

कमाल चौकात दिवसाढवळ्या थरार…… नागपूर : जमिनीच्या वादातून भूखंड व्यावसायिकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. …

Leave a Reply

Your email address will not be published.