Breaking News

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! याच महिन्यात सुरू होतेय बहुप्रतिक्षित सेवा,

प्रवासात अजिबात नाही येणार कंटाळा…….

शिवशक्ती टाइम्स न्यूज
प्रतिनिधी – युसूफ पठाण

दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेली कंटेंट ऑन डिमांड (सी.ओ.डी.) ही सेवा
याच महिन्यापासून सुरू होणार आहे.
रेल्वे मंत्रालयाकडून ही सेवा या महिन्यापासून सुरू करण्याची मंजुरी मिळाली आहे.
त्यामुळे रेल्वे प्रवाशांना आता मनोरंजनासाठी नवीन सुविधा मिळणार आहे.
भारतीय रेल्वेचे पीएसयू रेलटेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.

⭕बफर फ्री स्ट्रीमिंग मिळणार :-

कंटेंट ऑन डिमांड या सेवेअंतर्गत धावत्या रेल्वे प्रवासात प्रवाशांना त्यांच्या डिव्हाइसवर (मोबाइल किंवा अन्य उपकरण) चित्रपट, बातम्या, म्युझिक व्हि.डी.ओ. असा प्रीलोडेड बहुभाषिक कंटेट उपलब्ध करुन दिला जाईल.
विशेष म्हणजे प्रवासात नेटवर्कमुळे स्ट्रीमिंग बफर होऊ नये यासाठी रेल्वेच्या डब्यात मीडिया सर्व्हर ठेवलं जाणार आहे.
मीडिया सर्व्हरमुळे प्रवाशांना धावत्या रेल्वेतही आपल्या डिव्हाइसमध्ये हाय क्वालिटी बफर फ्री स्ट्रीमिंगची सेवा मिळेल, असं रेलटेलचे सी.एम.डी. पुनीत पुनावाला यांनी सांगितलं.

⭕कुठे होणार सुरू ? :-

ही सेवा ५ हजार ७२३ उपनगरी रेल्वेसह(लोकल) ८ हजार ७३१ ट्रेन आणि वाय-फाय असणाऱ्या ५ हजार ९५२ रेल्वे स्थानकांवर सुरू होणार आहे.
पश्चिम रेल्वेमार्गावर एका राजधानी एक्सप्रेस आणि एका ए.सी. लोकलमध्ये ही सुविधा अंतिम टप्प्यात असून चाचणी सुरू आहे.
यात रेल्वे आणि रेलटेलमध्ये ५०-५० टक्के महसूल विभागून घेतला जाणार आहे.
पी.एस.यू.ला या प्रकल्पातून किमान ६० कोटी रुपयांच्या वार्षिक उत्पन्नाची अपेक्षा आहे.

About Shivshakti Times

Check Also

“…मानसिक तयारी ठेवा”, राजेश टोपेंचा राज्यातील जनतेला इशारा………

शिवशक्ती टाइम्स न्यूज पत्रकार – युसूफ पठाण मुंबई ः राज्यात करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने सध्या …

अखेर सरकारने आधार-पॅनकार्ड लिंक करण्यासाठी ३० जूनपर्यंत दिली मुदतवाढ !

शिवशक्ती टाइम्स न्यूज पत्रकार – युसूफ पठाण आधारकार्ड (Adhaar Card) आणि पॅनकार्ड (Pan Card) लिंक …

नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन ?

तर… राज्यात लॉकडाऊन अटळ शिवशक्ती टाइम्स न्यूज मुंबई  : राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *