Breaking News

महिलेच्या घरात घुसून विनयभंगाचा प्रयत्न,

भा.ज.पा.च्या नगरसेवकाला अटक………

शिवशक्ती टाइम्स न्यूज
प्रतिनिधी – युसूफ पठाण

ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील भा.ज.पा.चे नगरसेवक नितीन तेलवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
महिला नगरसेविकेचा विनयभंग केल्याप्रकरणी त्यांना अटक झाली आहे.
एका महिला नगरसेविकेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात माहिती दिली.
“मुरबाडचे नगरसेवक नितीन तेलवणे यांनी मध्यरात्री जवळपास १२ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास घरात घुसून नगरसेवक असलेल्या महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला”, अशी माहिती देशमुख यांनी दिली.
याप्रकरणी तेलवणे यांच्यावर आयपीसी कलम 452 (बळजबरी घरात प्रवेश), 354 (विनयभंग), 354 अ (लैंगिक छळ) आणि 506 (धमकावणे) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे,
असंही देशमुख यांनी सांगितलं.
राज्याच्या राजकारणात एकीकडे धनंजय मुंडेंवर झालेले आरोप आणि त्यानंतर अलिकडेच पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आलेला असताना, आता घरात घुसून महिला नगरसेविकेचा विनयभंग केल्याप्रकरणी भा.ज.पा.च्या नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे.
नितीन तेलवणे हे मुरबाडचे नगरसेवक आहेत.

About Shivshakti Times

Check Also

कोरोना नियमांचे पालन करून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न

कोरोना नियमांचे पालन करून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न शिवशक्ती टाइम्स न्यूज …

राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबणीवर

राज्यात 1 मे पासून लसीकरण सुरु होणार नाही राज्यात लसीकरण सुरु करण्यासाठी पुरेसा लसी उपलब्ध …

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबांना मोफत बियाणे, खते वाटप

मालेगाव तालुका ॲग्रो डिलर्स असोसिएशनच्या वतीने शेतकऱ्यांना करण्यात आलेल्या मदतीचा उपक्रम स्तुत्य : कृषी मंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *