Breaking News

कोविड सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग ; ठाकरे सरकारकडून गंभीर दखल……..

कोविड सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग ; ठाकरे सरकारकडून गंभीर दखल……..

शिवशक्ती टाइम्स न्यूज
प्रतिनिधी – युसूफ पठाण

कोविड सेंटरमध्ये डॉक्टरकडून महिला रुग्णावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना औरंगाबाद शहरात घडली.
या घटनेचे विधानसभेत पडसाद उमटले.
सभागृहात हा मुद्दा उपस्थित करण्यात आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं.
विनयभंगाचा प्रयत्न होणं, हे देखील वाईट कृत्य असल्याचं सांगत उपमुख्यमंत्र्यांनी कोविड सेंटर्ससाठी महिला सुरक्षेच्या अनुषंगाने एस.ओ.पी. लागू करण्यात येईल, अशी घोषणा केली.
औरंगाबाद शहरातील पदमपुरा भागात असलेल्या कोविड सेंटरमध्ये एका डॉक्टरनेच महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
रात्रीच्या वेळी राऊंडवर असताना डॉक्टरने महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
महिलेनं आरडाओरड करताच डॉक्टर तेथून फरार झाला.
ही घटना समोर आल्यानंतर प्रशासनाने चौकशी सुरू केली होती.
दरम्यान, कोविड सेंटरमध्ये घडलेल्या घटनेचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर निवेदन केलं.
पवार म्हणाले, “औरंगाबादमधील रुग्णालयात उपचार घेणाऱ्या भगिनीसोबत घडलेली विनयभंगाच्या प्रयत्नाची घटना दुर्दैवी आहे.
संबंधित भगिनीवर बलात्कार झालेला नाही.
मात्र, विनयभंगाचा प्रयत्न होणे हे देखील वाईट कृत्य आहे.
सरकारने ही संपूर्ण घटना गांभीर्याने घेतली आहे.
याप्रकरणाची प्राथमिक चौकशी स्थानिक महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे.
विनयभंगाचा प्रयत्न झाल्याच्या भगिनीच्या आरोपात प्रथमदर्शनी तथ्य आढळून आलं आहे.
याप्रकरणी संबंधित आरोपी डॉक्टरला बडतर्फ करण्यात आलं आहे.
भगिनीचे नाव गोपनीय ठेवण्यात येत आहे.
याप्रकरणाची सखोल चौकशी करुन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल,” असं अजित पवार म्हणाले.

About Shivshakti Times

Check Also

पीक विम्याबाबत विमा कंपनीला देखील कळवा : दादाजी भुसे

प्रतिनिधी – यूसुफ पठाण शिवशक्ती टाइम्स न्यूज औरंगाबाद, दिनांक 26 (जिमाका) : मागील काही दिवसांत …

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे त्वरीत पंचनामे करा – पालकमंत्री सुभाष देसाई

स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारक आणि पाणी पुरवठा योजनेची कामे सुरू करा शिवशक्ती टाइम्स न्यूज  –  प्रतिनिधी – …

बुधवारपर्यंत पिक कर्ज वाटप करावे अन्यथा बँक समोर उपोषण शेख सलीम

प्रतिनिधी – युसूफ पठाण (शिवशक्ती टाइम्स न्यूज )  – सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील एसबीआयच्या शाखेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *