Breaking News

आर.टी.ओ. (R.T.O.) फिटनेस, वाहन इन्शुरन्ससारखी बनावट कागदपत्रे तयार करणारी टोळी जेरबंद…….

आर.टी.ओ. (R.T.O.) फिटनेस, वाहन इन्शुरन्ससारखी बनावट कागदपत्रे तयार करणारी टोळी जेरबंद…….

शिवशक्ती टाइम्स न्यूज

प्रतिनिधी युसूफ पठाण

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीला जेरबंद केले आहे.
सामाजिक सुरक्षा पथकाने आशीर्वाद कॅफेवर छापा टाकून टोळीला अटक केली आहे.
ही टोळी आर.टी.ओ. (R.T.O.) फिटनेस, टॅक्स पावती, वाहन इन्शुरन्स, पोलीस क्लीअरन्स सर्टिफिकेट अशी बनावट कागदपत्रे तयार करत होती, तसेच आतापर्यंत आठशे व्यक्तींना त्यांनी बनावट कागदपत्रे बनवून दिल्याचं समोर आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक सुरक्षा पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली काळेवाडीतील आशीर्वाद कॅफेवर छापा टाकून बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
आशीर्वाद कॅफेचा मालक राहुल गौड हा त्याच्या इतर पाच साथीदारांसह बनावट कागद पत्र तयार करत होता.
यात, आर.टी.ओ. (R.T.O.) फिटनेस, टॅक्स पावती, वाहन इन्शुरन्स, पोलीस क्लीअरन्स सर्टिफिकेट अशी बनावट कागदपत्रे संगणकावर बनवली जात होती.
आरोपी राहुल ज्या व्यक्तीला बनावट कागदपत्रे बनवून घ्यायची आहेत त्यांच्याशी संपर्क करुन व्हाट्सऍपवर नाव आणि पत्ता घ्यायचा, त्यानंतर बनावट कागदपत्रे तयार करून दिली जायची.
याप्रकरणी अद्याप दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे यांच्या पथकाने केली
. याप्रकरणी मुख्य आरोपी राहुल गौड, बालाजी गोरख बाबर, तुकाराम अर्जुन मगर, प्रवीण दशरथ दळवे यांना अटक करण्यात आली आहे.
अटक केलेल्या आरोपींकडून १ लाख २१ हजारांचा (एकलाख एकवीस हजार)मुद्देमाल, बनावट कागदपत्रे तयार करण्याचे साहित्य, प्रिंटर, पेन ड्राइव्ह, झेरॉक्स मशीन यासह काही सर्टिफिकेट, एक मोबाईल आणि रबरी स्टॅम्प जप्त केले आहेत.

About Shivshakti Times

Check Also

राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे

राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे- वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन शिवशक्ती टाइम्स न्यूज …

आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नांने नगरविकास मंत्र्यांची नांदगाव ला भरघोस मदत

आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नांने नगरविकास मंत्र्यांची नांदगाव ला भरघोस मदत शिवशक्ती टाइम्स न्यूज – …

नाशिक -मुंबई राष्ट्रीय महामार्गाची तातडीने दुरुस्ती करा मंत्री छगन भुजबळ यांचे आदेश

वडपे ते गोंदे आणि वडपे ते मुलुंड टोल नाका परिसरातील रस्त्यांच्या कामासाठी मंत्री छगन भुजबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *