Breaking News

राष्ट्र सेवा दलाच्या वतीने महिला दिना निमित्त सेवा दलातील महिला रणरागिनींना अभिवादन

शिवशक्ती टाइम्स न्यूज

मालेगाव- येथील राष्ट्र सेवा दलाच्या वतीने महिला दिना निमित्त सेवा दलातील महिला रणरागिनींना अभिवादन करण्यात आले. यात १० महिला रणरागिणींचा समावेश आहे. त्यांचे फोटो जेष्ठ सेवा दल सैनिक रणरागिणी आरती बरीदे यांनी मालेगाव राष्ट्र सेवा दल शाखेला भेट दिले. यात प्रामुख्याने
बाया कर्वे, सुधाताई वर्दे, शैलाताई लोहिया, कुसुमताई पटवर्धन, लीलाताई पाटील, पुष्पा भावे, प्रमिला दंडवते, मृणालताई गोरे, डॉ वीणा सुराणा, ज्योतीताई कोरडे या रणरागिनींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
तसेच याच प्रसंगी राष्ट्र सेवा दल मालेगाव अभ्यासिकेसाठी कोषाध्यक्ष राजेंद्र दिघे यांनी २ खुर्च्या तर साथी सुज्ञा खैरनार यांचे कडून ४ खुर्च्या भेट देण्यात आल्या. राष्ट्र सेवा दला तर्फे या वेळी महिला आरोग्य पंधरवाडा राबविण्यात येणार असल्याचे सेवा दल पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले. यामध्ये महिलांच्या आरोग्य प्रश्नावर प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा संघटक रविराज सोनार, तालु संघटक सारंग पाठक, राजेंद्र दिघे, महेश गायकवाड, नचिकेत कोळपकर , बळवंत अहिरे आदी सह सेवा दल सैनिक उपस्थित होते.

About Shivshakti Times

Check Also

भाईजी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे मालेगांव येथे रुग्णांना अन्नदान व पाणी बॉटल वाटप

भाईजी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे मालेगांव येथे रुग्णांना अन्नदान व पाणी बॉटल वाटप मालेगाव – …

मालेगाव शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांना पोलिस प्रशासनाच्या वतीने जाहीर आवाहन

विना मास्क फ़िरणाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल 14 दिवस होम आयसोलेट व्यक्ती बाहेर फिरताना …

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ येथील राष्ट्र सेवा दल व समविचारी संघटनांच्या वतीने आंदोलन

शिवशक्ती टाइम्स न्यूज : मालेगाव- दिल्ली येथील सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ येथील राष्ट्र सेवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *