Breaking News

मुहूर्त निश्चित विवाहसोहळे बंदीमुळे अडचणीत

करोना संसर्गामुळे प्रशासनाचे र्निबध…….

नाशिक : करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १५ मार्चपासून मंगल कार्यालय, लॉन्स, सभागृह वा तत्सम ठिकाणी विवाहसोहळा तसेच गर्दी जमेल अशा कार्यक्रमांवर बंदी घातल्यामुळे या तारखेनंतर विवाहाचा मुहूर्त निश्चित झालेल्यांची अडचण झाली आहे.
मुहूर्तानुसार अनेकांनी मंगल कार्यालय, लॉन्सची आधीच नोंदणी केली आहे.
पत्रिकाही वितरित करण्यात आल्या.
भोजन, मंडप वा तत्सम व्यवस्थांसाठी आगावू रक्कमही दिली गेली.
अकस्मात विवाहसोहळ्यावर बंदी आल्याने लग्नाची तयारी करणारे कुटुंबीय हबकले आहेत.
याचा सर्वाधिक आर्थिक फटका वधुपित्याला बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
शहर आणि जिल्ह्यत करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे.
मर्यादित संख्येत करोनाचे नियम पाळून लग्नसोहळ्यांना परवानगी होती.
परंतु अनेक लग्नांमध्ये मयादेपेक्षा अधिक गर्दी होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.
राजकीय मंडळींच्या कुटुंबातील लग्नात तर करोनाचे नियम सर्रास धाब्यावर बसविले गेले.
संबंधितांवर कारवाई मात्र झाली नाही.
लग्नसोहळ्यातील गर्दी करोना प्रसाराचे केंद्र ठरत असल्याचे लक्षात घेऊन प्रशासनाने उपरोक्त निर्णय घेतला आहे.
१५ मार्चपर्यंत पूर्व नियोजित असलेल्या कार्यक्रमांबाबत स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस ठाण्याच्या परवानगीने नियम पाळून आयोजक, मंगल कार्यालय, लॉन्स, सभागृहधारकांना सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत परवानगी राहील.
१५ मार्चनंतर लॉन्स, मंगल कार्यालय, सभागृह अशा ठिकाणी लग्न समारंभ किं वा तत्सम कार्यक्रमांच्या आयोजनावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

About Shivshakti Times

Check Also

श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर संपूर्ण जिर्णोद्धारासह तर गर्भगृह चांदीच्या नव्या नक्षकांत रूपाने झळकणार…!

श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर संपूर्ण जिर्णोद्धारासह तर गर्भगृह चांदीच्या नव्या नक्षकांत रूपाने झळकणार…! भाविकांनी सढळ …

महाराष्ट्रातील 72 न्यूज पोर्टलच्या स्वनियमन संस्थेला केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याकडून मान्यता

महाराष्ट्रातील 72 न्यूज पोर्टलच्या स्वनियमन संस्थेला केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याकडून मान्यता (संपादक – जयेश …

मालेगावी श्रीराम नवमी शोभायात्रा मिरवणुक जल्लोशात संपन्न

मालेगावी श्रीराम नवमी शोभायात्रा मिरवणुक जल्लोशात संपन्न शिवशक्ती टाइम्स काल दि. 10 एप्रिल रोजी चैत्र …

Leave a Reply

Your email address will not be published.