Breaking News

लोकलच्या दरवाजाजवळ उभे राहून न बोलण्याचे आवाहन ……..

फटका गँगमुळे रेल्वे जेरीस, २७ ठिकाणी रेल्वे पोलीस तैनात

शिवशक्ती टाइम्स न्यूज

मुंबई : लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्यांच्या हातावर फटका मारून मोबाइल, बॅग लंपास करणाऱ्या फटका गँगला जेरबंद करण्यात रेल्वे पोलीस अपयशी ठरले आहेत.
त्यामुळे आता मध्य रेल्वे सुरक्षा दलाने फटका गँगविरोधात कंबर कसली असून या टोळीला जेरबंद करण्यासाठी त्रिसूत्री आखण्यात आली आहे.
दरम्यान, लोकल डब्याच्या दरवाजाजवळ उभे राहून भ्रमणध्वनीवर बोलणाऱ्या किंवा बॅग घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मतपरिवर्तन करण्याच्या दृष्टीने जनजागृती करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करताना अनेकांना मोबाइलवर बोलण्याची सवय असते, तर काही प्रवासी खांद्यावर बॅग लटकवून दरवाजात उभे असतात.
हे हेरून रुळांजवळील खांब किंवा झुडुपात लपून बसलेले चोर प्रवाशाच्या हातावर एखाद्या लोखंडी किंवा लाकडी वस्तूने जोरदार प्रहार करतात.
प्रवाशाकडील वस्तू रुळावर पडताच ती लंपास करून चोर पोबारा करतात.
यामुळे प्रवाशाच्या जीवावरही बेतण्याचा धोका असतो.
फेब्रुवारी २०१८ मध्ये कल्याणमध्ये राहणाऱ्या द्रविता सिंग या तरुणीला फटका गँगने लक्ष्य केले होते.
सॅण्डहर्स्ट रोड स्थानकाजवळील रुळाजवळच खांबाआड दडून बसलेल्या चोराने बांबूच्या साहाय्याने तिच्या डोक्यावर फटका मारला.
यात ती लोकलमधून तोल जाऊन पडली आणि विरुद्ध दिशेने जाणाऱ्या लोकलने तिला धडक दिली.
यात तिला एक पाय व एका हाताची बोटे गमवावी लागली.
यानंतरही सातत्याने अशा घटना घडतच आहेत.
मार्च २०२० पासून करोनामुळे टाळेबंदी लागली व लोकल सेवा थांबली.
त्यानंतर जून महिन्यापासून अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू झाली.

About Shivshakti Times

Check Also

श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर संपूर्ण जिर्णोद्धारासह तर गर्भगृह चांदीच्या नव्या नक्षकांत रूपाने झळकणार…!

श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर संपूर्ण जिर्णोद्धारासह तर गर्भगृह चांदीच्या नव्या नक्षकांत रूपाने झळकणार…! भाविकांनी सढळ …

महाराष्ट्रातील 72 न्यूज पोर्टलच्या स्वनियमन संस्थेला केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याकडून मान्यता

महाराष्ट्रातील 72 न्यूज पोर्टलच्या स्वनियमन संस्थेला केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याकडून मान्यता (संपादक – जयेश …

मालेगावी श्रीराम नवमी शोभायात्रा मिरवणुक जल्लोशात संपन्न

मालेगावी श्रीराम नवमी शोभायात्रा मिरवणुक जल्लोशात संपन्न शिवशक्ती टाइम्स काल दि. 10 एप्रिल रोजी चैत्र …

Leave a Reply

Your email address will not be published.