Breaking News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कडक लॉकडाउनचा इशारा ; म्हणाले…..

शिवशक्ती टाइम्स न्यूज -प्रतिनिधी – युसूफ पठाण

राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनचा इशारा दिला आहे.
उद्धव ठाकरे यांनी जे.जे. रुग्णालयात जाऊन करोनाची लस घेतली.
यावेळी पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते.
लस घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत उद्धव ठाकरेंनी लोकांना लसीबद्दल कोणतीही भीती किंवा संभ्रम न बाळगण्याचं आवाहन केलं.
विशेष म्हणजे यावेळी त्यांनी पुन्हा एकदा कडक लॉकडाउनचा इशारा दिला आहे.
येत्या एक दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
“लसीकरणाबाबत कोणतीही भीती किंवा संभ्रम ठेवण्याची गरज नाही.
लस घेताना अजिबात कळतही नाही, इतक्या सहज पद्धतीने ती दिली जात आहे.
करोनाचा वाढत असल्याने लसीकरणासाठी पात्र ठरलेल्या सर्वांनी मनात कोणतीही शंका न बाळगता लस घ्यावी,” असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली करोनाची लस पुढे बोलताना ते म्हणाले की, “कदाचित काही दिवसांमध्ये काही ठिकाणी लॉकडाउन करावा लागेल.
त्यामुळे लसीकरण करुन घ्या, बाहेर अनावश्यक गर्दी टाळा, विनाकारण बाहेर येणं-जाणं टाळा,
सार्वजनिक ठिकाणी मास्क लावा, हात धुवा, अंतर ठेवा”.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कोविड लसीचा पहिला डोस घेतला.
“कदाचित आपल्याला पुन्हा एकदा पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल.
अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही, पण ती जाऊ नये असं वाटत असेल तर ही बंधन पाळणं गरजेचं आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

About Shivshakti Times

Check Also

“…मानसिक तयारी ठेवा”, राजेश टोपेंचा राज्यातील जनतेला इशारा………

शिवशक्ती टाइम्स न्यूज पत्रकार – युसूफ पठाण मुंबई ः राज्यात करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने सध्या …

अखेर सरकारने आधार-पॅनकार्ड लिंक करण्यासाठी ३० जूनपर्यंत दिली मुदतवाढ !

शिवशक्ती टाइम्स न्यूज पत्रकार – युसूफ पठाण आधारकार्ड (Adhaar Card) आणि पॅनकार्ड (Pan Card) लिंक …

नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन ?

तर… राज्यात लॉकडाऊन अटळ शिवशक्ती टाइम्स न्यूज मुंबई  : राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *