शिवशक्ती टाइम्स न्यूज
लोण प्र. उ.येथील सरपंच पदाच्या अपात्रतेच्या आदेशाला स्थगिती
गावकऱ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण
भडगाव तालुक्यातील लोण प्र. उ.येथील लोकनियुक्त सरपंच सौ संगीता बापू पाटील तसेच त्यांचे पती बापू नागो पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण केले अशी तक्रार गावातील गीता भाऊसाहेब पाटील यांनी जिल्हाधिकारी साहेब जळगाव यांच्याकडे केली होती. त्याची चौकशी होऊन लोकनियुक्त सरपंच सौ संगीता बापू पाटील तसेच बापू नागो पाटील यांना सरपंच व सदस्य पदावर चालू राहण्यास जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरविले होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयास सरपंच व सदस्य पाटील यांनी नाशिक येथील अप्पर आयुक्त यांच्याकडे अपील दाखल करून जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयास आव्हान दिले होते. गेल्या वेळी झालेल्या सुनावणीस सरपंच व सदस्य यांच्या तर्फे जळगाव येथील एडवोकेट विलास पाटील यांनी जोरदार बाजू मांडली व त्यांना पदावर कार्यरत केले. दि. 12 मार्च 2021 रोजी अप्पर आयुक्त साहेब यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशास पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे भडगाव तालुक्यात व लोण प्र. उ.गावांमधील गावकऱ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे