Breaking News

आता जुन्या वाहनांच्या RC रिन्यूवलसाठीचा खर्च वाढणार

शिवशक्ती टाइम्स न्यूज

प्रतिनिधी – युसूफ पठाण

परिवहन मंत्रालयाने काल एक ड्राफ्ट नोटिफिकेशन जारी केले आहे , हे नोटिफिकेशन सरकारकडून जारी करण्यात आलेल्या , वाहन स्क्रॅपेज पॉलिसीचा एक भाग आहे

😱 तुमच्याकडे 15 वर्ष जुनी कार किंवा इतर कोणतं वाहन असल्यास, – त्या वाहनाच्या RC रिन्यूवलसाठी आता अधिक पैसे द्यावे लागतील

💁‍♂️ जाणून घ्या याविषयी सविस्तर

● या ड्राफ्ट नोटिफिकेशन नुसार, कारच्या RC रिन्यूवलसाठी कार मालकाला 5000 रुपये द्यावे लागतील. तर बाईक मालकाला सध्या 300 द्यावे लागतात मात्र हा नियम लागू झाल्यानंतर 1000 रुपये द्यावे लागतील.

● यात सर्वात कठिण परिस्थिती बस आणि ट्रक मालकांची होऊ शकते, ज्यात 15 वर्ष जुन्या बस किंवा ट्रकच्या फिटनेस रिन्यूवल सर्टिफिकेटसाठी ,त्यांना 12 हजार 500 रुपये द्यावे लागतील

● याव्यतिरित कमर्शियल वाहनांमध्ये मोटरसायकलच्या फिटनेस सर्टिफिकेट 500 रुपये चार्ज असेल, तर रिन्यूवल किंमत 1000 रुपये द्यावी लागणार ,

● थ्री व्हिलरच्या नवीन सर्टिफिकेट 1000 रुपये , तर रिन्यूवलसाठी 3500 रुपये द्यावे लागतील – तर टॅक्सी, कॅबसाच्या फिटनेस सर्टिफिकेटसाठी 1000 रुपये आणि रिन्यूवल साठी 7000 रुपये चार्ज द्यावा लागेल

● म्हणजे सरळ सरळ , आता जुन्या वाहनांच्या RC रिन्यूवलसाठीचा खर्च हा अनेक पटीने वाढणार आहे , तशी याविषयी आणखी काही माहिती आली तर आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत पोहचवू

● दरम्यान परिवहन मंत्रालयाने – जारी केलेले ड्राफ्ट नोटिफिकेशन , हे सर्व सामान्यांसाठी नक्कीच खूप महत्वाचे आहे , आपण थोडा वेळ काढून इतरांना देखील अवश्य शेअर करा.

About Shivshakti Times

Check Also

श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर संपूर्ण जिर्णोद्धारासह तर गर्भगृह चांदीच्या नव्या नक्षकांत रूपाने झळकणार…!

श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर संपूर्ण जिर्णोद्धारासह तर गर्भगृह चांदीच्या नव्या नक्षकांत रूपाने झळकणार…! भाविकांनी सढळ …

महाराष्ट्रातील 72 न्यूज पोर्टलच्या स्वनियमन संस्थेला केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याकडून मान्यता

महाराष्ट्रातील 72 न्यूज पोर्टलच्या स्वनियमन संस्थेला केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याकडून मान्यता (संपादक – जयेश …

मालेगावी श्रीराम नवमी शोभायात्रा मिरवणुक जल्लोशात संपन्न

मालेगावी श्रीराम नवमी शोभायात्रा मिरवणुक जल्लोशात संपन्न शिवशक्ती टाइम्स काल दि. 10 एप्रिल रोजी चैत्र …

Leave a Reply

Your email address will not be published.