Breaking News

अन्यथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा”-चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

शिवशक्ती टाइम्स न्यूज

प्रतिनिधी – युसूफ पठाण

राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाने राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे.
दरमहा १०० कोटी रुपये जमवून द्या,
असं अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना सांगितलं होतं,
असा आरोप सिंग यांनी केला आहे.
सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भा.ज.पा.ने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
पुण्यातील अलका चौकात भा.ज.पा.चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकाळी आंदोलन करण्यात आले.
यावेळी पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही राजीनाम्याची मागणी केली.
परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांमुळे अनिल देशमुख वादात सापडले आहेत.
देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भा.ज.पा.कडून राज्यातील विविध शहरांत आंदोलन करण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात आंदोलन करण्यात आलं.
यावेळी माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले, “गृहमंत्री अनिल देशमुख हे जर राजीनामा देत नसतील तर शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांचा राजीनामा घेण्यास भाग पाडले पाहिजे.
हा विषय देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केल्यावर विधानसभा अनेक वेळा तहकूब झाली.
यामुळे परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे वर्षभर असाच तमाशा चालू होता हे स्पष्ट झाले आहे.
तसेच सभागृहात देखील सचिन वाझेला वाचविण्याचे काम अनिल देशमुख यांनी केले असून, या संपूर्ण प्रकरणी देशमुख हे देखील दोषीच आहेत.
त्यामुळे त्याचा राजीनामा घ्यावा आणि त्यांची उच्च स्तरीय समिती मार्फत चौकशी करण्यात यावी,” अशी मागणी पाटील यांनी केली.

राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेचे स्वागत- चंद्रकांत पाटील……

“अब तो ये स्पष्ट है, ठाकरे सरकार भ्रष्ट है”,
“राजीनामा द्या, राजीनामा द्या, ठाकरे सरकार राजीनामा द्या”, अशा घोषणा देत भा.ज.पा.च्या वतीने पुण्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करण्यात आलं.
यावेळी भा.ज.पा.चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेचं स्वागत केलं.
आंदोलनावेळी यावेळी प्रतिकात्मक नोटा देखील उधळत अनिल देशमुख यांच्या फोटोला जोडे मारून भा.ज.पा.ने निषेध नोंदवला.
“गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी म.न.से. अध्यक्ष राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी देखील केली आहे.
त्यांच्या भूमिकेचे मी स्वागत करतो, असं चंद्रकांत पाटील आंदोलनादरम्यान माध्यमांशी बोलताना म्हणाले.
“त्यांना हात जोडून विनंती करतो की, आम्हाला बळ देऊ नका.
अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी लढा देऊया.
आमच्या खांद्याची तुम्हाला अस्पृश्यता जरी असेल, तरी सर्वांनी स्वतंत्रपणे रस्त्यावर उतरून लढा दिला पाहिजे.
अंजली दमानिया यांच्यासह सर्वांना आवाहन आहे
तुम्ही कुठे आहात?
शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे, विद्या चव्हाण या महिलांवरील अन्याय अत्याचाराबद्दल आवाज उठवतात.
त्या कुठे आहेत?,
” असा सवाल देखील पाटील यांनी उपस्थित केला.
वर्षभरातील ठाकरे सरकारचा कारभार हा हाताबाहेर गेला असून, आता ठाकरे सरकारचा राजीनामा झाला पाहिजे, अशी मागणी आम्ही राज्यपाल यांच्याकडे करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
“ठाकरे सरकार हे पूर्णपणे भ्रष्टाचाराच्या चिखलात रुतलेलं आहे.

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.