Breaking News

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात ए.टी.एस. (A.T.S.) ने केली २ व्यक्तींना अटक !

शिवशक्ती टाइम्स न्यूज

प्रतिनिधी – युसूफ पठाण

राज्यात एकीकडे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बची चर्चा असतानात दुरीकडे ए.टी.एस.नं मोठी कारवाई केली असून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात २ जणांना अटक करण्यात आली आहे.
आधी या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं.
मात्र, चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती ए.एन.आय.नं दिली आहे.
निलंबित पोलीस हवालदार विनायक शिंदे आणि बुकी नरेश धरे या दोघांना ए.टी.एस.नं अटक केली आहे.
मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्याच्या खाडीत सापडला होता.
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ठेवण्यात आलेल्या स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्यामुळे खळबळ उडाली होती.
या कारमुळे मनसुख हिरेन यांचं नाव या प्रकरणाशी जोडलं गेलं आणि त्यांचाच संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं.
सध्या जिलेटिन कांड्या प्रकरणाची चौकशी एन.आय.ए.कडून सुरू असून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास ए.टी.एस.कडून सुरू आहे.
या प्रकरणाचा तपास एन.आय.ए.कडे सोपवण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत.
मनसुख हिरेन यांच्या पत्नीने या प्रकरणात थेट सचिन वाझे यांच्यावर आरोप केले असून एन.आय.ए.नं अँटिलियाबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्यांच्या प्रकरणात सचिन वाझेंना अटक केली आहे.
मनसुख हिरेन यांची कार सचिन वाझे वापरत होते, असा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.
सचिन वाझेंच्या निलंबनासोबतच या प्रकरणाच्या संबंधातच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करून त्यांना होम गार्डची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

About Shivshakti Times

Check Also

राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे

राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे- वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन शिवशक्ती टाइम्स न्यूज …

आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नांने नगरविकास मंत्र्यांची नांदगाव ला भरघोस मदत

आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नांने नगरविकास मंत्र्यांची नांदगाव ला भरघोस मदत शिवशक्ती टाइम्स न्यूज – …

नाशिक -मुंबई राष्ट्रीय महामार्गाची तातडीने दुरुस्ती करा मंत्री छगन भुजबळ यांचे आदेश

वडपे ते गोंदे आणि वडपे ते मुलुंड टोल नाका परिसरातील रस्त्यांच्या कामासाठी मंत्री छगन भुजबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *