शिवशक्ती टाइम्स न्यूज
उपसंपादक – आनंद दाभाडे
मालेगाव महानगरपालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्ती व त्यांचा सांभाळ करणारे व्यक्ती यांना कळविण्यात येते की महाराष्ट्र शासन निर्णय व महासभा ठराव क्रमांक 255 दिनांक 20-12-2018 च्या ठरावानुसार दिव्यांग व्यक्तींना विविध योजनांचा लाभ देणे संदर्भात निर्णय झालेला आहे
मालेगाव- महापालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्ती यांची प्रथम नोंदणी करणे व दिव्यांग व्यक्तींना नोंदणी क्रमांक देणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या दिव्यांग व्यक्तींना नोंदणी केलेले नाही अशा महापालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्ती व त्यांचा सांभाळ करणारी व्यक्ती यांनी महापालिकेने विहित केलेल्या नमुन्यात आवश्यक माहिती व कागदपत्रांसह अर्ज सादर करावे सदर अर्ज 31 मार्च 2021 ते 31 मे 2021 पावेतो सुटीचे दिवस वगळून महापालिका नियंत्रण कक्ष मुख्य इमारत मालेगाव महानगरपालिका येथे कार्यालयीन वेळेत दाखल करावे.
सदर अर्ज – दिव्यांग कक्ष एन ए वाडीया दवाखाना मालेगाव येथे मिळतील
दिव्यांग व्यक्तींची नोंदणी झाल्यानंतर विविध योजनांचा लाभ देणे कामे त्यांचेकडून विहित नमुन्यातील स्वतंत्र अर्ज मागविण्यात येतील.