Breaking News

1 जूननंतर हॉलमार्क असलेले सोने विकणे बंधनकारक, आता फक्त तीन दर्जांचे दागिनेच विकले जाणार

सोन्याच्या विक्री संदर्भात हा मोठा निर्णय, १ जूनपासून होणार लागू

शिवशक्ती टाइम्स न्यूज

उपसंपादक-आनंद दाभाडे

Gold Jewellery Hallmarking: सरकारने सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्क आवश्यक केले आहे. 1 जून 2021 नंतर हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकले जाऊ शकत नाहीत. भारतीय मानक ब्यूरो अर्थात बीआयएसने सर्व नोंदणीकृत ज्वेलर्सना एक अधिसूचना जारी केलीय. सोन्याची शुद्धता आता तीन श्रेणींमध्ये विभागली जाणार आहे. प्रथम 22 कॅरेट, दुसरा 18 कॅरेट आणि तिसरा 14 कॅरेटचे टप्पे असतील. 14 कॅरेट च्या दागिन्यांमध्ये 58. 50 % सोने असते 18 कॅरेट च्या दागिन्यांमध्ये 75% सोने असते 22 कॅरेट च्या दागिन्यांमध्ये 91. 60% टक्के सोने असते
ग्राहक आणि ज्वेलर्स दोघांनाही याचा फायदा होणार आहे.

24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध

सोन्याची शुद्धता कॅरेक्टर मोजली जाते त्यामुळे 24 कॅरेटचे सोने सर्वात शुद्ध मानले जाते मात्र त्यातून दागिन्यांची निर्मिती होऊ शकत नाही म्हणून दागिन्यांच्या निर्मितीसाठी 22 कॅरेट सोन्याचा उपयोग केला जाऊ शकतो

विना हॉलमार्क दागिने असल्यास

अजून नंतर केवळ हॉलमार्क असणाऱ्या दागिन्यांची विक्री होणार असली तरी सध्या ग्राहकांकडे उपलब्ध असणाऱ्या विना हॉलमार्क दागिन्यांचे व्यवहार करता येणार आहेत याशिवाय ग्राहक आपल्या सर्वांच्या मदतीने आपल्याकडील सोन्याचे हॉलमार्किंग करू शकणार आहेत तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार बीआयएस पाच वर्षाचे अकरा हजार दोनशे पन्नास रुपये शुल्क आकारून सराफ व्यावसायिकांना परवाना देणार आहे त्यानंतर संबंधित हॉलमार्क सेंटर वर जाऊन लागेल याची तपासणी करून हॉलमार्क नोंदविला जाणार आहे त्यामुळे ग्राहकांना थेट व्यावसायिकाकडे जाऊन हॉलमार्क करू शकणार नाही त्यांना हनुमान सेंटरवर सोन्याची शुद्धता तपासावे लागणार आहे.

नियमभंग केल्यास एक वर्षाची शिक्षा

गेल्या वर्षी संमत झालेल्या बीआयएस कायद्यानुसार हाल मागच्या नियमांचा भंग केल्यास किमान एक लाख रुपयांपासून संबंधित दागिन्यांच्या किमतीच्या पाचपट दंड आणि वर्षभराच्या शिक्षेची तजवीज करण्यात आली आहे नकली दागिने पासून ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी हॉलमार्किंग बंधनकारक करण्यात आले आहे. हॉल मार्किंग करताना सोन्याची विविध पातळ्यांवर तपासणी होते त्यामुळे ग्राहकांच्या फसवणुकीची शक्यता कमी असते

ज्वेलर्स असोसिएशनच्या मागणीनुसार ती मुदत 1 जून 2021 पर्यंत वाढवली

सोन्यासाठी हॉलमार्किंग त्याच्या शुद्धतेचे वैशिष्ट्य आहे. सध्या ते अनिवार्य नाही. पूर्वी त्याची अंतिम मुदत 15 जानेवारी 2021 होती. ज्वेलर्स असोसिएशनच्या मागणीनुसार ती मुदत 1 जून 2021 पर्यंत वाढविण्यात आली. भारत मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात करतो आणि ते वापरतोही. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, भारत दरवर्षी सुमारे 700-800 टन सोन्याची आयात करतो. ज्वेलरी हॉलमार्किंगच्या प्रक्रियेत ज्वेलर्स बीआयएसच्या ए अँड एच सेंटरमध्ये दागिने ठेवतात आणि तिची गुणवत्ता तेथे तपासतात.

कन्झुमर अफेअर सचिव लीना नंदन यांनी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत सांगितले की यापुढे हॉलमार्किंगची अंमलबजावणी करण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही. बीआयएसचे महासंचालक प्रमोद कुमार तिवारी म्हणाले की, 1 जूनपासून याची अंमलबजावणी करण्यासाठी तयारी पूर्ण केली गेली आहे. आतापर्यंत मुदतवाढीचा कोणताही प्रस्ताव सरकारपर्यंत पोहोचलेला नाही. आतापर्यंत, मानक ब्यूरोमधील 34,647 ज्वेलर्सनी त्यांची नोंदणी केली आहे. पुढील एक-दोन महिन्यांत ही संख्या एक लाखांवर पोचेल.

घर बसल्या BIS नोंदणी करा

बीआयएसकडे नोंदणी प्रक्रिया ज्वेलर्ससाठी अधिक सोपी केली गेली आहे. हे काम आता घरूनही करता येईल, यासाठी www.manakonline.in या संकेतस्थळावर जा. ज्या कागदपत्रांची मागणी केली आहे, ती सबमिट करायची आहेत आणि नोंदणी फी जमा करावी लागेल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदार बीआयएसचा नोंदणीकृत ज्वेलर्स बनतो.

नोंदणी फी किती आहे हेसुद्धा जाणून घ्या

बीआयएस नोंदणी फीसुद्धा खूप कमी ठेवण्यात आलीय. जर ज्वेलर्सची उलाढाल 5 कोटींपेक्षा कमी असेल तर यासाठी नोंदणी फी 7500 रुपये आहे, पाच कोटी ते 25 कोटी दरम्यानच्या उलाढाल असल्यास नोंदणी फी वर्षाकाठी 15 हजार रुपये आणि 25 कोटी असू शकते, तर अधिक उलाढालीसाठी नोंदणी फी 40 हजार रुपये आहे. जर ज्वेलर्सची उलाढाल 100 कोटींच्या पलीकडे असेल तर ही फी 80 हजार रुपये आहे.

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.