Breaking News

कोरोना काळात के.बी.एच.च्या विद्यार्थ्यांचे अनोखे उतरदायीत्व!

 आनंद प्रसाद या सामाजिक कार्याला  ५२,०००/-  रुपयांची आर्थिक मदत

शिवशक्ती टाइम्स न्यूज- उपसंपादक आनंद दाभाडे

मालेगांव- सध्या कोरोना महामारी संकटात सगळेच जण त्रस्त झालेले असून,प्रत्येक जण आर्थिकदृष्ट्या विवचेंनत सापडला आहे.या गोष्टींचा विचार करत मालेगांव शहरातल्या के.बी.एच.महाविद्यालयाच्या सन २००३ च्या बँचच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येत आपल्या मित्रांकडून आर्थिक मदत जमा करुन मालेगांव शहरातील गोरवाडकर यांच्या सहकार्यातून सुरु असलेल्या आनंद प्रसाद या सामाजिक कार्याला या विद्यार्थ्यांनी सुमारे ५२,०००/- बावन्न हजार रुपयांची आर्थिक मदत एका धनादेशाव्दारे नुकतीच प्रदान केली आणि आपले सामाजिक उतरदायीत्व किती भक्कम आहे हे सिध्द करुन दाखविले त्यामुळे या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मालेगांवच्या आनंद प्रसाद या सामाजिक कार्य करणाऱ्या परिवारामार्फत अनेक विधायक कार्य केले जातात. अनेक अन्नदान कार्यक्रम, तसेच कॅम्प एरिया मध्ये आपला दवाखाना हि ते चालवतात. त्यामुळे कोरोना काळात आपण आनंद प्रसाद परिवाराकडे दिलेली मदत निश्चितच सत्कारणी लागणार असल्याची भावना शेवटी के.बी.एचच्या माजी विद्यार्थ्यांनी “शिवशक्ती टाइम्स न्युज” शी बोलताना व्यक्त केली.

ज्यांना शक्य असेल त्यांनीही या गोष्टीचा आदर्श घेऊन आपल्या कडून जी शक्य असेल ती मदत गरजू व्यक्तीस / संस्थेस करून आपली सामाजिक बांधिलकी जपावी असे आवाहन शिवशक्ती टाइम्स न्यूज कडून आपणास करण्यात येत आहे.

About Shivshakti Times

Check Also

अजंग-रावळगाव येथील औद्योगिक भूखंडासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 18 जून पर्यंत मुदत वाढ

अजंग-रावळगाव येथील औद्योगिक भूखंडासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 18 जून पर्यंत मुदत वाढ शिवशक्ती टाइम्स न्यूज …

तुम्हाला KYC साठी कॉल किंवा मेसेज आल्यास सावधान

तुम्हाला KYC साठी कॉल किंवा मेसेज आल्यास सावधान-गृह मंत्रालयाचा अलर्ट! आपली बँक रिकामी होऊ शकते …

सिक्स सिग्मा व सनराईज रुग्णालय बनावट कागदपत्रांच्या आधारे सुरू केल्याप्रकरणी संचालकावर गुन्हा दाखल

मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांचा पदभार काढला मालेगाव : प्रतिनिधी कोरोना रूग्णांकडून अव्वाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *