Breaking News

उमराणेत जमिनीसाठी शुभमने केला खून ! देवळा पोलिसांनी आरोपीला आणले पकडून!!

मतलबी व लालची नातवाने आपल्याच आजोबाचा केवळ जमिनीसाठी केला निर्घृणरित्या खुन

शिवशक्ती टाइम्स न्यूज
संपादक-जयेश सोनार – दाभाडे
उपसंपादक -आनंद दाभाडे

आजकाल ज्या काही खुनासारख्या घटना घडतात,त्यातील बहुतांशी कारणे हि संपतीचा हव्यास व लालसेपोटीच घडत असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.खुनासारखे गंभीर प्रकार घडायला कारणेही तशीच असतात.आजपर्यंत सर्वाधिक खुन हे जर- जोरु-आणि जमीनीच्या वादातूनच घडले असल्याचे निष्पन्न होऊनही,माणूस आजकाल एवढा हैवान व मतलबी का होत चालला हे न सुटणारे कोडे आहे.कितीही संपत्ती कमावली तरी ती येथेच राहणार आहे,माणसाला मेल्यानंतर फक्त साडेतीन हात जमीनच लागणार आहे हे सत्य माहित असूनही आजकाल लालसेपोटी हैवान होत चालला आहे.कोरोना सारख्या महामारीच्या काळात आपली खरी संपत्ती देखील काही कामाची नाही.हे समोर येऊनसुध्दा मतलबी व लालची नातवाने आपल्याच आजोबाचा केवळ जमिनीसाठी निर्घृणरित्या खुन करुन मानवतेला काळीमा फासला आहे.
सोमवार दिनांक १० मे २०२१ रोजी घडलेल्या या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.मात्र देवळा पोलिसांनी समयसुचकता दाखवित या घटनेतील मुख्य आरोपीस अवघ्या काही तासातच जेरबंद करुन अटक केल्याने देवळा पोलिसांचे विशेषतः कौतुक होत असून,त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मतलबी व लालची नातवाचा पोलिसांनी कसा केला पर्दाफाश त्याचीच हि कथा…!

दिनांक १० मे २०२१ रोजी सोमवारी देवळा तालुका पोलिसांना उमराणे ते झाडी रस्त्यालगत एका अविवाहीत व वृध्द व्यक्तीचा खुन झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळाकडे धाव घेतली.घटनास्थळावरील पोलिसांचे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर पोलिसांनी मग आपल्या तपासाला सुरुवात केली.उमराणे हे गाव नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात मुंबई -आग्रा महामार्गावर वसलेले कांदा बाजारपेठचे एक मोठे ठिकाण असून,या गावातील शेतकरी वर्ग बरेपैकी सधन म्हणून ओळखला जातो.मुंबई -आग्रा महामार्गालगत काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी असल्याने त्यांना सोन्याचा भाव लाभला आहे.अशा या उमराणे गावाच्या शेतशिवारात झाडी रस्त्याला पंडित सुकदेव देवरे वय ६७ हा इसम आपल्या दोघा अविवाहित बहिणीसोबत मळ्यातच वास्तव्यास होता.पंडित देवरेंचे व त्याच्या बहिणींचे वय झाले तरी लग्न झालेले नव्हते,ते आपल्या शेतातच राबराब राबून आपली उपजीविका भागवत होते.व प्रपंचाचा गाडा हाकत होते.अशा या पंडित सुकदेव देवरे याची एक बहिण चांदवड तालुक्यातील राजधेरवाडी येथे राहते,तर त्या बहिणीचा नातू शुभम लक्ष्मण जाधव हा नेहमीच उमराणे येथील पंडित देवरे यांच्या शेतात येऊन,शेतीची कामे करण्यास पंडित देवरे यांना सातत्याने मदत करीत असायचा.त्यामुळे पंडित देवरे यांनाही एक प्रकारे समाधान वाटायचे व आपल्या बहिणीचा नातू आपल्याला शेतकामात मदत करतो हे बघून पंडित देवरे अक्षरशः भारावून जायचे व मनोमनी विचार करायचे की,जाऊ द्या आपले जरी लग्न झाले नाही तरी आपली शेतजमीन बहिणीचा नातू करतो यातच ते समाधानी असायचे,मात्र रविवार दिनांक ९ मे २०२१ रोजी रात्री 1१ वाजेच्या दरम्यान कुणीतरी अज्ञात इसमाने वयोवृध्द पंडित देवरे यांचा खुन केल्याची माहिती देवळा तालुका पोलिसांना मिळाली .पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन सगळे सोपस्कार पार पाडले आणि मग आपला मोर्चा तपासाच्या दिशेने वळविला.दुर्दैवी मयत पंडित देवरे हे आपल्या अविवाहित बहिणीसह शेतात राहत असताना त्यांचेकडे सातत्याने कुणाचे येणे-जाणे होते याचा पोलिसी तपास सुरु असतानाच चांदवड तालुक्यातल्या राजधेरवाडी येथील पंडित सुकदेव देवरे यांच्या बहिणीचा नातू शुभम लक्ष्मण जाधव हा नेहमीप्रमाणे पंडित देवरे यांच्या उमराणे येथील शेतात येऊन राहायचा व शेतीची कामे करायचा अशी प्राथमिक माहिती पोलिस तपासात पुढे आल्याने व पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरु करताच शुभमच्या हालचाली या पोलिसांना संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी शुभम जाधव यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरु करताच त्याने हा खुन आजोबा पंडित सुकदेव देवरे यांची आठ एकर शेती आपल्याला मिळेल या मतलबी व लालची वृतीनेच केला असल्याचे कबूल केले.या गंभीर गुन्ह्यांचा तपास अत्यंत कौशल्याने नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील,अप्पर पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी कळवण अमोल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सुहास देशमुख पोलिस निरीक्षक देवळा,संजय मातोंडकर, पी.एस.आय.खंडेराव भवर,पो.हवा मोठाभाऊ बच्छाव,पोलिस नाईक चंद्रकांत निकम,योगेश क्षीरसागर,किरण पवार,दता गायकवाड ,
पो.काँ.निलेश सावकार,सचिन भामरे,सचिन चौधरी आदीच्या तपास पथकाने अवघ्या चोवीस तासात आरोपी शुभम लक्ष्मण जाधव याच्या मुसक्या आवळत त्याला गजाआड केले.देवळा पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

लेखन – साभार पोलीस पत्रकार

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *