Breaking News

राष्ट्र सेवा दलातर्फे यदुनाथ थत्ते आणि विकास मंडळ यांना अभिवादन

राष्ट्र सेवा दलातर्फे यदुनाथ थत्ते आणि विकास मंडळ यांना अभिवादन

शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी – युसूफ पठाण

मालेगाव- येथील राष्ट्र सेवा दल कोरोना योद्धा तत्कालीन कार्याध्यक्ष विकास मंडळ यांचे प्रथम स्मृतीदिन आणि महाराष्ट्र राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष तथा आंतरभारतीचे प्रवर्तक यदुनाथजी थत्ते यांच्या स्मृतिदिन निमित्ताने अँप द्वारे ऑनलाईन कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रास्ताविक करतांना जिल्हा संघटक रविराज सोनार यांनी साथी विकास मंडळ सेवा पथकाची स्थापना करणार असल्याचे सांगितले. तसेच विकास मंडळ यांच्या विषयी भावना व्यक्त केल्या. श्रीमती कविता मंडळ यांनी विकास मंडळ यांच्या स्मृतीनिमित्ताने रोप लावून अभिवादन केले. विकास मंडळ यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचारांचे सच्चे पाईक होते. आतून बाहेरुन पूर्णतः पारदर्शी व्यक्तिमत्त्व होते, असे सांगितले. यावेळी बोलतांना त्यांना भावना अनावर झाल्या.
राष्ट्र सेवा दल राज्य कार्याध्यक्ष अर्जुन कोकाटे यांनी विकास मंडळ हे एक आदर्श सैनिक तर होतेच पण एक आदर्श शिक्षक ही होते. उत्तम संघटक होते. त्यांच्या कार्याची आठवण ठेवत मालेगाव सेवा दलाच्या वतीने ‘साथी विकास मंडळ सेवा पथक’ सुरू करत आहात हे निश्चित अभिमानास्पद आहे, असे वक्तव्य केले.
जिल्हा कार्याध्यक्ष विलास वडगे यांनी सांगितले की विकास मंडळ आमच्यात नाहीत हे अजूनही विश्वास बसत नाही. त्यांचे सोबतीने आम्ही अनेक उत्तम उपक्रम कार्यक्रम केलेत. त्यांना विसरणे शक्य नाही. पूर्णवेळ कार्यकर्ते नचिकेत कोळपकर यांनी सूत्रसंचालन केले. कोषाध्यक्ष राजेंद्र दिघे यांनी आभार मानले.
या प्रसंगी तालुका कार्याध्यक्ष सुधीर साळुंखे, तालुका संघटक सारंग पाठक, राजीव वडगे, प्रवीण वाणी यांनी मेसेज द्वारे भावना व्यक्त केल्यात. ऑनलाईन कार्यक्रमात प्रा. भाऊसाहेब गमे, दिनकर दाणे, किशोर जाधव (येवला) आदींसह सेवा दल सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.