Breaking News

पाच दिवसात पाच लाखांची नवरी पळाली : नवरीसह दोघांना अटक

पाच दिवसात पाच लाखांची नवरी पळाली : नवरीसह दोघांना अटक

शिवशक्ती टाइम्स न्यूज

मालेगाव : प्रतिनिधी

लग्न होण्यास अडचणी येणाऱ्या उपवरांना हेरून लग्नाचा बार उडवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. तालुक्यातील राजमाने येथील एका तरुणाला हेरून पाच लाख उकळून त्याला नवरी मिळवून देण्यात आली. परंतु, लग्नानंतर अवघ्या पाचच दिवसांत नवरीने पोबारा केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे नवरोबाच्या लक्षात आले. दरम्यान, याप्रकरणी राजमाने येथील भाऊलाल तोताराम सुमराव यांच्या फिर्यादेवरून तालुका पोलीस ठाण्यात आठ जणाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून जालन्यातील वधूसह दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना १५ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

फिर्यादी भाऊलाल या तरुणाचा विश्वास संपादन करून आरोपी शिवा रमेश भाट, जयसिंग रमेश भाट, अर्जुन रामसिंग चव्हाण (तिन्ही रा. शेरुळ ता.मालेगाव), संतोष भिका सारंग (रा. पिंजारपाडा ता. चाळीसगांव), संगिता लक्ष्मण म्हस्के, चित्रा अशोक चौधरी ( दोन्ही रा. जालना), आकाश पांडुरंग सोनवणे, विजय विराटे (दोन्ही रा. औरंगाबाद) यांनी संगनमत करून मुलगी चित्रा अशोक चौधरी हिच्यासोबत लग्न लावुन दिले. मोबदल्यात त्यांनी भाऊलाल यांच्या कडून पाच लाख रुपये घेतले. नंतर मुलगी चित्रा हिने इतर आरोपींच्या सांगण्यावरुन फिर्यादीस ‘मला सोबत राहावयाचे नाही. मला जालना येथे पोहचून दे, तु जर मला पोहचुन दिले नाही तर मी माझे जीवाचे काही तरी बरे वाईट करुन घेईल, असा दम दिला. यामुळे फिर्यादी व साक्षीदार यांनी आरोपी यांना फोन केला असता आरोपी यांनी फिर्यादीस सांगितले की, तुम्ही आमची मुलगी आमच्या ताब्यात द्या. आम्ही तुमचे पैसे देतो असे सांगितल्यामुळे फिर्यादी यांनी मुलीस सोबत घेवुन मुंबई- आग्रा महामार्गावर असलेल्या हॉटेल ए-वन सागरचे आवारात आले. तेथे आरोपींनी आमची मुलगी चित्रा हिस आमच्या सोबत पाठवा तुमचे पैसे नंतर देवु असे सांगितले असता फिर्यादी व साक्षीदार यांनी दिलेल्या पैशाची मागणी केली. यावेळी आरोपींनी फिर्यादीस व साक्षीदार यांना शिवीगाळ करुन तुम्हाला खोटया गुन्हयात अडकावुन देवु असा दम दिल्यामुळे भाऊलाल याने तालुका पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी वधू चित्रासह आकाश पांडुरंग सोनवणे व विजय वराटे यांना अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक देवीदास दुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मोहित मोरे करत आहेत.
आरोपींनी यापूर्वीही केली फसवणूक
यापूर्वीही सदर आरोपींनी साक्षीदार शोभाबाई बापु परदेशी यांचा मुलगा सचिन यांचे लग्न लावून देण्याच्या मोबदल्यात त्यांचे कडुन दोन लाख ५० हजार रोख रुपये घेतले. साक्षीदार यांचा मुलगा सचिन व पायल यांचे लग्न लावून दिले होते. नंतर काही दिवसांनी साक्षीदार यांची पत्नी पायल हिने संगनमत करुन ती साक्षीदार यांच्या घरातुन निघुन जावुन ती आरोपी चित्रा चौधरी हिच्याकडे राहत होती.
भूलथापांना बळी पडू नका पोलिसांचे आवाहन
याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना, औरंगाबाद व मालेगांव येथील ही टोळी अविवाहित तरुणांचा शोध घेवून अशा प्रकारे त्यांची फसवणूक करतात. यासाठी मुली उपलब्ध करुन पैसे घेवुन लग्न लावुन देणारे, लग्न जमवुन देणारे एजंट किवा लोक यांचे भुलथापाना बळी पडू नये. व आपली फसवणुक करुन घेवु नये. अशा प्रकारे फसवणुक करणाऱ्या बऱ्याच टोळ्या सक्रीय आहेत. त्यामुळे नागरिकांनी वेळीच सावधान व्हावे. अशा प्रकारचे कृत्य कोणी करत असेल त्या बाबतची माहिती मालेगाव तालुका पोलीस ठाणेस दयावी. असे आवाहन पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकात खांडवी, उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत शिंदे तसेच पोलीस निरीक्षक देविदास दुमणे यांनी केले आहे.
साभार संकलन -प्रकाशदूत

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.