Breaking News

कोविशील्ड लसीच्या दुसरा डोस चे अंतर १२ ते १६ आठवड्यांचे

कोविशील्ड लसीचा पहिला डोस झाल्यानंतर 84 दिवसांनंतर दुसरा डोस देय

शिवशक्ती टाइम्स न्यूज

सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की नाशिक जिल्ह्यात covid-19 प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. covid-19 प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत केंद्र व राज्य शासनाच्या प्राप्त सूचनांनुसार यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतलेला आहे अशा लाभार्थ्यांना लसीच्या दुसऱ्या डोसचे अंतर ६ ते ८ आठवड्यांवरून वरुन १२ ते १६ आठवड्यांचे इतके अंतर ठरविण्यात आलेले आहे.
म्हणजेच कोविशील्ड लसीचा पहिला डोस झाल्यानंतर 84 दिवसांनंतर दुसरा डोस देय राहील याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तात्पुरते स्वरूपात शासनाच्या पुढील सूचना येईपर्यंत थांबविण्यात आले आहे याचीही सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी प्राप्त लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जावे इतर नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये व प्रशासनास सहकार्य करावे

About Shivshakti Times

Check Also

अजंग-रावळगाव येथील औद्योगिक भूखंडासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 18 जून पर्यंत मुदत वाढ

अजंग-रावळगाव येथील औद्योगिक भूखंडासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 18 जून पर्यंत मुदत वाढ शिवशक्ती टाइम्स न्यूज …

तुम्हाला KYC साठी कॉल किंवा मेसेज आल्यास सावधान

तुम्हाला KYC साठी कॉल किंवा मेसेज आल्यास सावधान-गृह मंत्रालयाचा अलर्ट! आपली बँक रिकामी होऊ शकते …

सिक्स सिग्मा व सनराईज रुग्णालय बनावट कागदपत्रांच्या आधारे सुरू केल्याप्रकरणी संचालकावर गुन्हा दाखल

मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांचा पदभार काढला मालेगाव : प्रतिनिधी कोरोना रूग्णांकडून अव्वाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *