Breaking News

आयुक्त भालचंद्र गोसावी यांची धडक कारवाईचे आदेश.

*शहरात विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची अँटिजेन तपासणी*

शिवशक्ती टाईम्स न्युज

*_आयुक्त भालचंद्र गोसावी यांची धडक कारवाईचे आदेश._*

• *कोरोना पॉझिटिव्ह आढळणाऱ्यांची मनपा सी.सी.सी. सेंटरमध्ये रवानगी.*
• *आयुक्त गोसावी यांनी दिली सर्व कोविड सेंटर ला भेट.*

*मनपा जनसंपर्क:* मालेगाव मनपा कार्यक्षेत्रात आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्या आदेशानुसार शहरातील विविध ठिकाणच्या 4 चेकपोस्ट वर शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून विनाकारण शहरात बाहेर फिरणाऱ्या तसेच विनामास्क असलेल्या नागरिकांचे रॅपिड एंटीजन टेस्ट (RAT) करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यामुळे विनाकारण बाहेर फिरणाऱ्या चे धाबे दणाणले आहे.
आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी मालेगाव शहरात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग चांगल्या पद्धतीने व्हावे, शहराबाहेरून गावात येणारे, तसेच एखादा पॉझिटिव व्यक्ती विनाकारण शहरात फिरत असल्यास त्याच्यामुळे होणाऱ्या कोरोना प्रसारास आला घालता यावा या बहुआयामी दृष्टीने उपायुक्त रोहिदास दोरकुळकर आणि आरोग्य अधिकारी सपना ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ममता लोथे , डॉक्टर अलका भावसार यांच्या आधिपत्याखाली मालेगाव शहरात आज 1. रावळगाव नाका, 2.महात्मा गांधी पुतळा, 3.छत्रपती शिवाजी पुतळा, 4.मोतीबाग नाका अशा एकूण चार चेक पोस्ट च्या ठिकाणी रॅपिड एंटीजन टेस्ट करण्यात आल्यात. उक्त तपासणीत कोरोना पॉझिटिव आढळणाऱ्या नागरिकांना त्वरित महानगरपालिकेच्या CCC सेंटरला उपचारासाठी भरती करण्यात येत आहे. सदरच्या चेक पोस्ट वरील सुरुवात मागील 3 दिवसांपासून मोतीबाग नाक्यावर करण्यात आली होती. त्याची उपयोगिता आणि व्यापकता अधिक करण्यासाठी आज शहरातील आणखीन 3 चेक पोस्ट वर तपासणी ची नाक्यांवर सोय केली गेली. याची प्रत्यक्ष पाहणी आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी प्रत्येक नाक्यावर भेट देऊन केली आणि शहरातील आणखीन पोलीस व इतर चेकपोस्ट वर तपासणी नाक्यांची संख्या 8 ते 10 करण्याचे निर्देश आरोग्य अधिकारी आणि संबंधितांना दिलेत. आज सर्व 4 नाक्यावर मिळून 124 नागरिकांची तपासणी करण्यात आली आणि त्यात पॉझिटिव सापडलेल्या एका नागरिकास मसगा महाविद्यालय येथे त्वरित क्वारंटाईन करण्यात आले. यावेळी आयुक्त गोसावी यांनी निर्देश दिलेत की,
1. पॉझिटिव आलेल्या रुग्णाच्या सर्व जवळच्या संबंधित नातेवाईक इ. हाय रिस्क कॉन्टॅक्ट ( एच.आर सी.) यांचे सक्तीने स्व‌ॅब घेण्यात यावे आणि जे स्व‌ॅब देणार नाहीत त्यांना सक्तीने मनपाच्या संस्थात्मक क्वारंटाईन सेंटर ला दाखल करण्यात यावे.
2. होम आयसोलेशन कमी करून जास्तीत जास्त संस्थात्मक क्वारंटाईन करण्यावर भर देण्यात यावा. ज्यांच्याकडे स्वतंत्र कक्षाची इतर विहित सुविधांसह पूर्तता असेल आणि त्यांच्या हमीसह खात्री प्रशासनास होईल अशीच होम आयसोलेशन परवानगी द्यावी.
यावेळी काही नागरिकांनी स्वयं स्पूर्तीने तपासणी करून घेतली असेही आढळून आले. नागरिकांना लगेच त्यांचे रिपोर्ट सांगितलेने नागरिकांनी प्रतिसाद ही चांगला दिला. यावेळी महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना पोलीस प्रशासनाने चांगले सहकार्य केले.

आज दि.18/5/2021 रोजीच्या रॅपिड एंटीजन टेस्ट अहवाल

एकूण रॅपिड एंटीजन टेस्ट – 124

गिरणा पूल, मोतीबाग नाका – 31

मोसम पुल महात्मा गांधी पुतळा – 30
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – 38

रावळगाव नाका, कॅम्प – 25

एकूण: 124

कोरोना पॉझिटिव्ह – 01
निगेटिव्ह -123

तसेच आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी आज मनपाच्या सर्व कोविड सेंटर ला भेट देऊन पाहणी केली आणि सर्व संबंधितांना रुग्णांची सर्व सुख सुविधेसह काळजी घेण्याची निर्देश दिले. मसगा महाविद्यालय सी.सी.सी सेंटर, हज हाऊस, कलीम दिलावर हॉल, सहारा हॉस्पिटल आणि ऑक्सिजन युनिट येथील पाहणी करून योग्य आरोग्य व्यवस्था बाबत समाधान व्यक्त केले. तदनंतर भायगांव रोड व भायगाव येथील वसतिगृहाची सीसीसी सेंटर साठी पाहणी केली.

(दत्तात्रेय पी. काथेपुरी )
जनसंपर्क अधिकारी,
मालेगाव महानगरपालिका, मालेगाव

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.