Breaking News

राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलेल्या मागणीला यश

राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलेल्या मागणीला यश

केंद्र सरकारने दिला खत सबसिडी वाढविण्याचा निर्णय

शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी -युसुफ पठाण 

राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे उच्च किंमतीची खते खरेदी करणे शेतकर्‍यांना अवघड जाईल ह्या विचाराने महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री ना.दादाजी भुसे यांनी खतांच्या किंमती कमी कराव्यात अथवा खतांच्या दरामध्ये सबसिडी द्यावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने केंद्रीय कृषिमंत्री मा.नरेंद्रसिंगजी तोमर तसेच केंदीय रसायन व फर्टिलायझर मंत्री मा.डी.वी.सदानंदजी गौडा यांच्याशी पत्रव्यवहार करून मागणी केली होती तसेच सर्व खत उत्पादकांना गत हंगामाप्रमाणे राज्यात त्याच दराने खत विक्रीचे निर्देश देण्याचेही त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले जेणेकरून शेतकर्‍यांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही आणि शेतकरी खतांचा समतोल वापर करतील.

परिणामी, काल दि.२० मे रोजी रात्री मा.पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली खतांच्या दराच्या मुद्द्यावर बैठक झाली. त्यात डीएपी खतासाठी सबसिडी वाढवून रु.२४०० ऐवजी १२०० रुपयात विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रधानमंत्री कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
***

About Shivshakti Times

Check Also

भुकेल्याची भुक भागविण्याचे महत्वपूर्ण काम करते शिवभोजन केंद्र : कृषीमंत्री भुसे

सामान्य रुग्णालय परिसरात शिवभोजन केंद्राचे उद्घाटन शिवशक्ती टाइम्स न्यूज मालेगाव : प्रतिनिधी अल्प दरासह संकट …

माळमाथ्यावरील रस्त्याची दुरावस्था ग्रामस्थांनी केले खडयात वृक्षरोपण

मालेगाव : प्रतिनिधी  माळमाथ्यावरील गिगाव, रोंझाने, सिताने, खलाने, बोधे, माल्हणगाव या गावातील रस्त्यांची जीवघेणी दुरावस्था …

नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा-जिल्हाधिकारी

नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा शिवशक्ती टाइम्स न्यूज नाशिक – सर्व नागरिकांना सतर्क करण्यात येते …

Leave a Reply

Your email address will not be published.