Breaking News

मोसम नदीपात्रातील अवैधरीत्या वाळू चोरी थांबवा कॉग्रेसचे अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन

मोसम नदीपात्रातील अवैधरीत्या वाळू चोरी थांबवा कॉग्रेसचे अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन

शिवशक्ती टाइम्स न्यूज

मालेगाव : प्रतिनिधी
तालुक्यात मोसम नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या
वाळूचा उपसा करत चोरी केली जात आहे. वाळू तस्करांच्या या कृत्यामुळे नदीकाठावरील गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईचे सावट पसरले आहे. हंडाभर पाण्यासाठी तीव्र तापमानात महिला, अबालवृद्धांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. महसूल यंत्रणेने त्वरित लक्ष घालत मोसम पात्रातील ही अवैध वाळूचोरी थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा तालुका काँग्रेसतर्फे देण्यात आला आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांना निवेदन दिले.
गेल्या अनेक दिवसांपासून मोसम नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा दिवसरात्र सुरू असून यामुळे नदीपात्राचे पाण्याची धारणाशक्ती कमी होत आहे. याचा परिणाम मोसम नदीकाठावर असलेल्या वडनेर, अजंग, वडेल, खाकुर्डी, वजीरखेडे, वडगाव इत्यादी गावांतील पाणीपुरवठा योजनांवर झाला असून पाणीटंचाईचे संकट जाणवू लागले आहे. या अवैध वाळू उपशासंदर्भात संबंधित गावांच्या शेतकरी व नागरिकांनी महसूल प्रशासनाकडे अनेक तक्रारी केल्या आहेत मात्र अद्यापपर्यंत ही वाळूचोरी थांबली नसल्याकडे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. महसूल यंत्रणेने यासंदर्भात त्वरित कठोर कारवाई करावी अन्यथा काँग्रेसतर्फे व्यापक जन आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या शिष्टमंडळात डॉ. ठाकरेंसह सेवा दल अध्यक्ष सतीश पगार, डॉ. अरुण पठाडे, संजय पाटील, भाऊसाहेब पवार, राष्ट्रवादी महानगरप्रमुख दिनेश ठाकरे, संदीप पवार, नितीन बच्छाव आदींसह ग्रामस्थ  उपस्थित होते.

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.